केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपीक असून या पिकाखाली जवळ जवळ महाराष्ट्रातील 73500 हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार असे म्हणतात. एकट्या जळगाव जिल्ह्यात 48 हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये ही केळीचे क्षेत्र वाढत आहे. या लेखात आपण केळीच्या घडाचे व्यवस्थापन आणि त्याचे थंडीपासून संरक्षण कसे करावे याबद्दल जाणून घेणार आहोत.
- केळी फळाच्या घडाची व्यवस्थापन कसे करावे?
- निर्यातक्षम केळी मिळवण्यासाठी घडावर सात ते आठ फण्या ठेवून बाकी खालच्या फण्या धारदार विळ्याने कापून टाकाव्यात.
- केळीचा घड पूर्ण नीसल्यानंतर व केळफुल तोडल्यानंतर घडावर 0.5 टक्के पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट +1.0 टक्के युरिया+ स्पीकर यांची एकत्रित फवारणी करावी. यामुळे फळांची लांबी व घेर वाढून वजन ही वाढते.
- घड पूर्ण नीसल्यानंतर लगेच केळ फुल कापावे.
- केळीचा घड 0.5 मी मी जाडीच्या 75×100 सेंटीमीटर आकाराच्या सहा टक्के सच्छिद्र पिशवीने झाकावा. यामुळे घडाचे ऊन, पाऊस, धूळ आणि कीड यापासून संरक्षण होऊन घडाची प्रत सुधारते व वजणातही वाढ होते.
आ) घड अडकणे:
निसवनीची अवस्था ही पिकातील संवेदनशील अवस्था आहे. हिवाळ्यात पाण्यातील अंतर कमी होऊन पाने जवळ जवळ येतात. त्यामुळे घड बाहेर पडण्याचा मार्ग आकसला जाऊन घड सामान्यपणे बाहेर पडण्याचा असा निर्माण होतो. या विकृतीस घड अडकणे असे म्हणतात. केळीचा घड खोड आतच पडतो किंवा काही वेळेस घड अनैसर्गिकरित्या बुंधा फोडून बाहेर येतो. दांडा वेडावाकडा झालेला असतो. अशा घडांची वाढ होत नाही. काही कालांतराने दांडा मोडून घड खाली पडतो. या विकृती साठी वेळीच योग्य उपाययोजना करणे आवश्यक असते.
इ ) केळी पिकाचे थंडी पासून संरक्षण कसे करावे?
- केळी बागेस रात्री किंवा पहाटे लवकर पाणी द्यावे. केळीच्या बागेभोवती रात्रीच्या वेळेस ओला व वाळलेला कचरा एकत्र मिसळून फक्त दूर होईल अशा पद्धतीने जाळावा म्हणजे तापमान वाढण्यास मदत होते.
- बागेची हलकीशी टाचणी करून माती हलवून भेगा भरून घ्याव्यात. त्यामुळे केळी पिकाच्या मुळांवर होणारा कमी तापमानाचा परिणाम टाळला जातो. तसेच बुंध्याभोवती सोयाबीनचा भुसा किंवा शेतातील इतर सहज उपलब्ध साहित्य वापरून आच्छादन करावे.
- केळीच्या घडांना 100 गेज जाडीच्या 6 सच्छिद्रता असलेल्या पॉलिथिन पिशवी चे आवरण घालावे.
- केळीचे खोड मोडून लोंबकळत असलेल्या वाकलेल्या परंतु निरोगी पानांनी झाकावे.
- केळी बागेच्या चारही बाजूस शेवरी, गजराज, बांबू, सुरू, ग्रीन ग्रास यासारख्या वारा प्रतिबंधक झाडांची पट्टे दोन ओळीत लावावे. त्यामुळे थंड वारे अडवले जाऊन केळी बागेचे संरक्षण होते.
Share your comments