नवीन पिकांचे आणि फळांच्या वाणावर संशोधन करण्याचे काम देशातील विविध प्रकारचे कृषी विद्यापीठ आणि संशोधन संस्था सातत्याने करत असतात. त्यांच्या या अथक संशोधन कार्यातून शेतकऱ्यांना फायदेशीर अशा वानांची नवनिर्मिती होत असते. अशाच एका पेरूच्या वाण हे मंगळुरू येथील संशोधन संस्थेने विकसित केले असून या पेरूच्या वाणाचे नाव आहे 'अर्का किरण' हे होय. अनेक शेतकरी या पेरूच्या जातीची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. या लेखामध्ये आपण अर्का किरण जातीच्या पेरूचे वैशिष्ट्ये जाणून घेऊ.
नक्की वाचा:Cotton Varieties: देशी कापसाचे नवीन वाण 160 दिवसात तयार; जाणून घ्या 'या' वाणाविषयी
'अर्का किरण' पेरूची वैशिष्ट्ये
1- व्यावसायिक दृष्ट्या पेरूचे उत्पादन घेण्यासाठी अर्का किरण ही पेरूची जात शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
2- या जातीच्या झाडाला जास्त प्रमाणात व लवकर पेरू लागतात व विक्रीसाठी लवकर तयार होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर आर्थिक उत्पन्न हातात मिळते व बाजारपेठेत देखील चांगला भाव मिळतो.
3- या जातीच्या पेरूमध्ये लायकोपीन चे प्रमाण अधिक असल्याने ते आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. शरीरामध्ये इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम हा पेरू करतो. अर्का किरण जातीचे पेरू थोडे कठीण असतात मात्र आतली बाजू थोड्याशा हलक्या लाल रंगाची असते.
4- संकरित जात कामसारी व पर्पल लोकल यांच्या संकरातून विकसित केली असून या फळांचा गर गुलाबी असतो. अर्का किरण जातीच्या पेरूचे सरासरी वजन 90 ते 120 ग्रॅम असते. तसेच या या फळाचा टी एस एस 13-14 अंश ब्रिक्स असतो.
Share your comments