
pomegranet orcherd
फळ बागेमध्ये आणि फळांमध्ये सुरुवातीपासून पिकांची सदृढ वाढ झाली तर फळधारणा उत्तम होते. परिणामी फळांची वाढ सुद्धा व्यवस्थित प्रकारे होते. त्यामुळे फळपिकांना सुरुवातीपासून योग्य प्रमाणात खते द्यावीत.
पिकांच्या सुदृढ वाढीसाठी महत्त्वाची खते..
लागवडीआधी शेणखत, कोंबडी खत,हिरवळीची खते त्यांचा वापर केला तर जमिनीचा पोत सुधारला सोबत पिकांची सुदृढ वाढ होते. यानंतर नत्र,स्फुरद, पालाश यांचा वापर सुद्धा फुल व फळधारनेवर परिणाम करतो. नत्र पिकाच्या कायिक वाढीसोबत पानांचा आकार तसेच नवीन फुटवे वाढवतो
पानेवाढल्याने झाडासअन्नपुरवठा चांगल्या पद्धतीने होतो. त्यासाठी युरिया, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम – अमोनियम नायट्रेट ही रासायनिक खते उपयुक्त आहेत. जी पिकांना नत्र उपलब्ध करून देतात.
फुल व फळधारणेसाठी महत्त्वाचे अन्नद्रव्य पालाश..
फुल व फळधारणेसाठी महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणजे पालाश.
या द्रव्यांमुळे प्रामुख्याने पिष्टमय पदार्थांची निर्मिती आणि त्यांचे साखरेत रूपांतर होणे या क्रिया गतिशील होतात. त्यामुळे ऊस, कलिंगड, रताळी, फळे या शर्करायुक्त पिकांना या अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. या अन्नद्रव्या मुळे साखरेचे प्रमाण वाढते. तसेच फळांना व फुलांना चांगला रंग आणि आकार येतो.फळे व फुले तसेच पालेभाज्यांचा साठवणूक काळ वाढतो. त्यामुळे कृषी मालाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होते.
Share your comments