सीताफळ खाण्याचे आपल्या शरीरास मोठ्या प्रमाणात फायदे आहेत जे की सध्याचा सिजनला आपल्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर सीताफळ पाहण्यास भेटत आहे. सीताफळ हे पित्तासाठी, वात, रक्तवर्धक, हृदयासाठी सुद्धा खूप पोषक आहे. यामुळे आपल्याला येणारा जो वात आहे तो कमी होण्यास मदत होते.
केसांसाठीही फायदेशीर -
आजकाल पाहिले तर लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे होयला लागलेत, आणी आपण केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्स च उपयोग करतो पण त्याच ठीकाणी जर तुम्ही तुम्ही सीताफळ खाल्ले तर केस गळने बंद होईल. धावपळीच्या जीवनात आपण आपल्या केसांवर दुर्लक्ष करत आहोत, त्यामुळे केस गळणे, पांढरे केस होणे, टक्कल होणे इत्यादी. केस गळण्याचे जास्त प्रमाण असेल तर सिताफळ च्या बिया बकरीच्या दुधामध्ये वगळून लावावे, त्यामुळे केस गळणे बंद होईल आणि नवीन केसही येतील.
अॅसिडीटीचे प्रमाण कमी होणे :-
धावपळीच्या जीवनामध्ये आपण पोषण आहारावर लक्ष देत नाही त्यामुळे ही ऍसिडिटी चे प्रमाण वाढते, खूप लोक यावरती उपाय शोधत आहेत. आम्लपित्त शरीरात उष्णता जाणवणे, छातीत व पोटात जळजळ होने यावरती एक उपाय म्हणजे सीताफळ. सीताफळ खाल्ल्याने या प्रकारचे आजार होत नाहीत.
हेही वाचा:-शेतकरी बांधवांनी वाढणार डोकेदुखी, ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा, वाचा सविस्तर
तोंडावरील पिंपल्स कमी होणे -
तोंडावर जर पिंपल्स चे प्रमाण असेल तर तुम्ही सीताफळच्या पानांचा लेप लावावा त्यामुळे ते बरे होईल, खूप लोकांना पिंपल्स ची समस्या असते पण तुम्ही जर हा लेप लावला तर तुम्हाला फायदा होईल.
ब्लडप्रेशर प्रमाणामध्ये -
कोणत्याही टेन्शनमूळे लोकांचा रक्तदाब उच्च किंवा कमी होतो, उच्च झाला तरीही टेन्शन आणि कमी झाला तरीही, सीताफळ खाल्ल्याने रक्तदाब प्रमाणात राहतो. हृदरोगाच्या व्यक्तीसाठीही सीताफळ खाल्ल्याने फायदे आहेत.
भीती किंवा हृदयाची धडधड वाढत असेल तर सीताफळ खाणे उपयुक्त -
या व्यक्तींच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील किंवा ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल त्या लोकांनी सीताफळ आहारात घ्यावे. छातीत धडधडणे, किंवा एखाद्या गोष्टीच दडपण आले की ज्यांना हा त्रास होतो त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल.
अशक्तपणा निघून जातो -
आजारी पडल्यानंतर शरीरामध्ये थकवा,अशक्तपणा येणे काम करताना थकवा लागणे. जर तुम्ही आहारामध्ये सीताफळ घेतले तर शरीरामध्ये शक्ती येते काम करण्याची ऊर्जा येते व अशक्तपणा निघून जातो.
हेही वाचा:-सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील तर ती हार्ट अटॅक ची कारणे बनू शकतात
Share your comments