मात्र, फळांच्या साली आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. विशेष म्हणजे ह्या साली आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. बटाट्याच्या सालीत कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी कॉम्पलेक्ससोबतच आयर्न देखील भरपूर असते. या सालीतील हेच घटक शरीरातील अनेक कमतरता दूर करतात.
त्यामुळे अनेक आजार आपल्यापासू दूर राहतात.वजन कमी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाबासारख्या अनेक व्याधींवर गुणकारी बटाट्याची साल आहे. बटाट्याच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटामिन असल्याने, त्याच्या सेवनाने हाडांना मजबुती मिळते. व्हिटामिन-बी मुळे शरीराला ताकद आणि दिवसभराची ऊर्जा मिळते.
त्यामुळे शक्य तेवढ्या वेळा बटाटा हा सालीसकट खाण्याचा प्रयत्न करावा. बटाट्याच्या सालीचा आहारात समावेश करण्यासाठी आपण बटाट्याची साल बारीक करून खाऊ शकतो. यासाठी बटाट्याची साल ताजी किंवा वाळलेली असली तरी चालते.केळीची साल आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीचा सालीचा आहारात समावेश करण्यासाठी आपण सर्वात अगोदर केळीची साल स्वच्छ धुवून घा.
एक ग्लास पाणी गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये केळीची साल घाला आणि दहा मिनिटे हे पाणी चांगले उकळा आणि नंतर हे पाणी प्या. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. आपण केळीची साल मिक्सरमध्ये बारीक करून देखील आहारात घेऊ शकतो. दररोज सकाळी केळीच्या सालीची पावडर पाण्यात मिक्स करून पिल्याने आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते.
Share your comments