1. आरोग्य

जागतिक हृदय दिवस: तरुणांनो ‘दिल’ जपा; वाढतोय हृदयविकाराचा धोका

ललिता बर्गे
ललिता बर्गे
world heart day

world heart day

मुंबई- बदलती जीवनशैली व सकस आहाराच्या अभावामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अगदी तिशीतल्या तरुणालाही हृदयविकाराच्या घटनांना सामारे जावे लागत आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानाचे वाढते प्रमाण, व्यायामाचा अभाव ही तरुणांमध्ये हृदयविकार वाढण्याती प्रमुख कारणे आहेत.

जाणून घेऊया हृदयविकाराची कारणे व त्यावरील उपाय:-

आकडे बोलतात:

भारतामध्ये शहरी भागात होणा़या एकूण मृत्युमध्ये 25 टक्के मृत्युस हृदयरोग कारणभूत आहे. भारतात दरवर्षी १.५ दशलक्ष व्य्क्ती हृदयरोगामुळे मृत्यमुखी पडतात. मागील चार दशकापासून भारतातील हृदयरोगाचे प्रमाण ग्रामीण भागात दुपट्टीने तर शहरी भागात सहा पटीने वाढलेले आहे.

हदयरोगाची कारणे:

धुम्रपान - धुम्रपान हे 25 टक्के हदयरोगाने मृत्युमुखी पडण्याास कारणीभुत ठरते. हृदयरोग होण्योचा धोका हा रोज ओढण्याात येणाऱ्या सिगारेट किंवा बीडी यांच्या संख्येशी समप्रमाणत असतो. धुम्रपान बंद केले तरीही अशा व्यक्तीेमध्ये हृदयरोग होण्याचा धोका हा किमान १० वर्षतरी धुम्रपान न करणा़या व्यक्तीपेक्षा जास्त असतो.

उच्च रक्तदाब - ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा आजार असतो.त्यांना हृदयरोग होण्याचा धोका हा इतरांपेक्षा जास्त असतो.

शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण – ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रोलचे प्रमाणे २२० mg/dl पेक्षा जास्त असते. त्यांना हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो.

मधुमेह - मधुमेह असणा़या व्यक्तीना हृदयरोग होण्याचा धोका हा २ ते ३ पटीने जास्त असतो.

स्थुलपणा - स्थु्ल व्य्क्तीमध्ये हृदयरोग होण्याचा धोका हा जास्ती असतो.

शारिरीक निष्क्रियता – शारिरीक निष्क्रियता तसेच आरामदायी जीवन हृदयरोग होण्याास कारणीभूत असते.

मद्यपान – मद्यपान  हृदयरोगास कारणीभूत असते.

संतती नियमनाच्या गोळया - ज्या‍ स्त्रिया संतती नियमाच्या गोळया नियमित घेत असतात अशांना हृदयरोगाचा धोका अधिक असतो.

 

हृदयरोगास प्रतिबंधात्मक उपाय-

१. आहारातील बदल-

आहारात स्निग्ध् पदार्थाचे प्रमाण कमी करणे

आहारात मीठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे (५ ग्रॅम प्रति दिवस)

आहारात पालेभाज्या तसेच फळांच्या सेवनाचे प्रमाण वाढविणे.

२.

धुम्रपान बंद करणे 

आपले ध्येय हे धुम्रपान रहित समाज तयार करण्यारचे असावे.

३. रक्तदाब नियंत्रित करणे-

नियमितपणे आपला रक्तदाब तपासून घेणे व रक्तदाब वाढला असल्यास त्या वर नियमितपणे डॉक्टरांच्या मार्गदर्शना खाली उपचार घेणे.

४. नियमित व्यायाम करणे व स्थूवलपणा हाऊ न देण्याची खबरदारी घेणे

५. मद्यपान बंद करणे

अशा विविध प्रतिबंधात्माक उपाय योजनांनी वा जीवनशैलीतील बदलांनी हृदयरोग होण्यापासून प्रतिबंध घालता येतो.

 

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters