रिफाईंड तेल करताना प्रथम 300°C व दुसऱ्यांदा 464°C इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. तेल एकदा उकळले तर ते पुन्हा खाण्यासाठी योग्य राहत नसते. डबल आणि ट्रिपल रिफाईंड करण्याच्या प्रक्रियेत हेच तेल 2-3वेळा उकळल्याने त्यात काही विषारी घटक समाविष्ट होतात. त्यामुळे स्वस्त असले तरीही आरोग्यासाठी अत्यंत धोकादायी ठरू शकते.म्हणूनच आता आपल्या आहारविषयक सवयींचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे. "जुनं ते सोनं ' या उक्तीनुसार आरोग्यदायी, दीर्घायुषी असे आपल्या पूर्वजांनी दिलेला वसा घेऊन लाकडी घाण्याचे तेल वापरूया आणि आरोग्याचे संतुलन राखुया.
लाकडी घाण्याचे तेलच का?कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न करता 100%नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने निर्मिती केली जाते. शरीराला पोषक असे फॅटी ऍसिड, 'ई'जीवनसत्व आणि मिनरल्स अशा अनेक नैसर्गिक व औषधी गुणधर्माचे जतन केले जात असल्यामुळे या तेलाला चिकटपणा खुप असतो.
हे ही वाचा - रक्ताच्या गाठी होणे, जाणून घ्या उपचार
परिणामी, रिफांइड तेलाच्या तुलनेत स्वयंपाकासाठी हे तेल कमी प्रमाणात वापरले तरी चालते.लाकडी घाण्यामुळे शेंगदाणा जास्त दाबला जात नाही. 1 मिनिटात फक्त 14 वेळच फिरवला जातो. तेल तापमान रिफाईंड तेलाच्या तुलनेत खुपच कमी असते.
त्यामुळे शेंगामधील नैसर्गिक पोषक घटक नष्ट होत नाहीत.आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असा हायडेन्सिटी लिपोप्रोटीन (H.D.L) हा फक्त आहारात शुद्ध तेलाचा समावेश असेल तरच तयार होतो.डबल आणि ट्रिपल रिफाईंड करण्याच्या प्रक्रियेत हेच तेल 2-3वेळा उकळल्याने त्यात काही विषारी घटक समाविष्ट होतात. त्यामुळे स्वस्त असले तरीही आरोग्यासाठी अत्यंत धोकादायी ठरू शकते.म्हणूनच आता आपल्या आहारविषयक सवयींचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे.कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न करता 100%नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने निर्मिती केली जाते.
Share your comments