आधी तुम्ही दीर्घ श्वास घेतला. मग एपिग्लाॅटीस नावाचा घशातील पडदा श्वासनलिकेवर दाबला त्यानंतर तुम्ही दाबाखाली हवा बाहेर सोडली. हे करताना आवाजही झाला (ज्याला आपण खोकला म्हणतो) श्वासनलिकेतील चिकट पदार्थ व बेडकाही बाहेर आला, आपल्या लक्षातही न येता एवढ्या क्रिया आपण केल्या श्वासनलिकेत काही गेले (धूळ, पाणी,
अन्नकण इत्यादी) तर ते काढून टाकण्यासाठी खोकल्याचा उपयोग होतो खोकला हे अशा प्रकारे शरीराचे प्रतिकाराचे शस्त्रच आहे. रोगांमध्ये मात्र जिवाणू व विषाणूच्या क्रियेमुळे व दाहामुळे वारंवार खोकला येतो. बेडके पडतात पण खोकून खोकून छाती, घसा दुखायला लागतात, बेडक्यासहीत येणारा खोकला म्हणजे ओला खोकला.
नुसताच येणारा खोकला म्हणजे कोरडा खोकला होय कोरडा खोकला का येतो, ते आता पाहू आपल्या इच्छेने आपण खोकू शकतो आपल्या मनाविरुद्ध व इच्छेविरुद्धही आपल्याला खोकला येतो.पोटात जंतू असतील, घशाचा व स्वरयंत्राचा दाह होत असेल किंवा कर्करोगाच्या गाठीमुळे किंवा फुगीर महारोहिणीमुळे जर श्वासनलिकेवर दाब येत असेल तर कोरडा खोकला येतो काही मानसिक रोगातही
कोरडा खोकला येतो असा त्रासदायक खोकला थांबवण्यासाठी कोडेन नोस्कापीनसारखे औषध उपयोगी पडते. सोबत संबंधित रोगाचा उपचारही घेणे अगत्याचे ठरते. बेडके पडणाऱ्या खोकल्यात मात्र खोकलाविरोधी औषधे घेऊ नयेत. बेडके बाहेर आल्याने रोगजंतू शरीराबाहेर पडतात व ते आवश्यक असते. बेडक्याच्या तपासणीवरून रोगाचे निदानही करता येते. रोगाप्रमाणे उपाचार घेणेच श्रेयस्कर होय.
Share your comments