1. आरोग्य सल्ला

रात्री झोप का येत नाही? हे तुम्हाला माहिती आहे का? मग हे तुमच्यासाठीच

झोप स्वतःच अनेक रोग बरे करण्यास सक्षम आहे. झोपेच्या कमतरतेमुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तर येतातच

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रात्री झोप का येत नाही? हे तुम्हाला माहिती  आहे का? मग हे तुमच्यासाठीच

रात्री झोप का येत नाही? हे तुम्हाला माहिती आहे का? मग हे तुमच्यासाठीच

पण कमी झोपेमुळे मेंदूला थकवा जाणवतो, वजनही वाढते. रात्री झोप न लागणे, कूस बदलणे ही आता सामान्य समस्या बनली आहे. झोपेच्या गोळ्या घेणारे बरेच लोक आहेत परंतु हा कायमस्वरूपी उपाय नाही. खरं तर, झोप का येत नाही आणि त्यावर कायमस्वरूपी उपाय काय आहे हे समजून घ्यायला हवं. चला या संदर्भात काही खास कारणे आणि उपाय.अनावश्यक चिंता/तणाव घेणे: प्रत्येकाला चिंता/ तणावा खाली जगावे लागते, परंतु काही लोक अति भीतीमुळे चिंताग्रस्त होतात.सतत काहीतरी विचार करणे जसे की बऱ्याच लोकांना जास्त बोलण्याची सवय असते. त्याच प्रमाणे, असे बरेचजण आहेत जे मनात सतत काहीतरी विचार करत असतात. त्यांच्या मनात हे विचार रात्रीपर्यंत चालू असतात शरीर थकत नाही- जेव्हा मजूर/श्रमिकाचे शरीर थकते तेव्हा त्याला आपोआपच चांगली झोप येते.

त्यांचे जीवन सुखकर आहे, ज्यांचे शरीर अजिबात थकत नाही. त्यांना चांगली झोप येत नाही.अनियमित जीवनशैली आधुनिक माणसाला खाण्याची किंवा झोपण्याची वेळ निश्चित नाही. रात्री उशीरा झोपणे व सकाळी उशीरा उठणे. अनेकांना दिवसातून ३-४ तास झोपण्याची सवय असते. अशा प्रकारे त्यांची रात्रीची झोप पूर्ण होते. जेवणातही बदल झाला आहे, त्यामुळे झोपेत फरक पडला आहे.शारीरिक वेदना-काहींना शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होतात. उदा.सांधेदुखी, स्नायू दुखणे/कोणत्याही प्रकारचे आजार असल्यास झोप येत नाही.वास्तू दोष-घर वास्तुनुसार नसेल/वास्तुदोष असेल तरीही शांत झोप येत नाही. अशावेळी वास्तू तपासणी करून घ्यावी.अन्नात बदल- योग्यवेळी जेवण करा व चांगल्या अन्नाला जीवनशैलीचा भाग बनवा

असे म्हणतात की, दिवसभराचे जेवण केल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्या पण रात्रीचे जेवण केल्यानंतर काही वेळ चालणे आवश्यक आहे. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करा.सूर्यनमस्कार-शरीर थकवण्यासाठी झोपण्यापूर्वी शतपावली कराच पण दिवसभर शारीरिक श्रम जास्तीतजास्त करा.प्राणायाम- रोज रात्री झोप- ण्यापूर्वी ५-१० मिनिटे प्राणायाम करा.योग निद्रा- यासाठी शवासना मध्ये झोपा आणि शरीर आणि मन शांत ठेवा. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराला आराम द्या. श्वास घेणे व पूर्णपणे श्वास सोडणे. आता कल्पना करा की हात, पाय, पोट, मान, डोळे सर्व आरामशीर अवस्थेत झाले आहेत. स्वतःला सांगा, मी योगनिद्राचा अभ्यास करणार आहे. आता मन शरीराच्या वेगवेगळ्या भागात घेऊन जा आणि त्यांना आराम आणि तणावरहित होण्यास सांगा. आपले मन उजव्या पायाच्या बोटाकडे न्या.

पायाची सर्व बोटे, किमान पायाचे तळवे, पोटऱ्या, टाच, गुडघे, मांड्या, नितंब, कंबर, खांदे सैल ठेवा. त्याचप्रमाणे डावा पाय सैल सोडा. सहज श्वास आत घ्या.आता झोपूनच ५वेळा पूर्ण श्वास घ्या व श्वास सोडा.यामध्ये पोट,छाती वर खाली करतील. पोट वर-खाली होईल. हा व्यायाम दररोज करा. यामुळे मन थकून झोपेल आणि कोणीही कोणत्याही प्रकारचा विचार करणार नाही.दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपू नका.तामसिक आणि गरिष्ठ आहार घेऊ नका, रात्री फक्त हलकं जेवण करा .दिवसा/ दुपारी झोपणे सोडा.कोणत्याही प्रकारचे नशा/ औषध घेऊ नका.झोपण्यापूर्वी कोणतीही चिंता आणि विचार मनात ठेवू नका, कारण अन्न, पाणी, श्वास घेणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच चांगली झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे.रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे सोडून द्या. झोपेची वेळ रात्री 9 ते 10 च्या मधली निश्चित ठेवा. झोपेची वेळ बदलल्यामुळे झोपेची सायकल बिघडू शकते.

English Summary: Why can't I sleep at night? Do you know that Then this is for you Published on: 24 May 2022, 01:45 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters