जसे पोटात दुखतं, हात पाय दुखतात तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक दुखणे हे दिसते, पटकन लक्षात येते, पण मानसिक आजार दिसतही नाहीत आणि पटकन लक्षातही येत नाहीत.
मानसिक आजारांबद्दल समाजामध्ये अनेक चुकीच्या आणि वाईट समजुती आहेत.मानसिक आजार म्हणजे फक्त वेड लागणे अशी एक गैरसमजूत आपल्या समाजात आहे आणि वेड लागले म्हणजे वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही असा समज आहे.
पण मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे.मानसिक आरोग्य चांगले असण्याची लक्षणे –
- त्या माणसाचे मन शांत असते.
- इतरांबरोबर जुळवून घेता येते.- कोणी नावे ठेवली , कोणी उणीदुणी केली तरीही दुखावले न जाणे.- आपल्या प्रश्नांना आपणच उत्तर शोधणे.- आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे ते ठरवणे.- मनावर ताबा असणे.- जीवनातले ताण-तणाव, काळजी सहन करण्याची क्षमता असणे.
मानसिक आरोग्य चांगले राहण्याकरिता - योग्य, पुरेसा आणि वेळेत संतुलित आहार घेणे.- स्वतःची व परिसराची स्वच्छता ठेवणे.- चांगल्या सवयी लावून घेणे-धुम्रपान, मद्यपान न करणे.- नियमित व्यायाम करणे.- ताणताणाव व काळजी कमी करणे.
English Summary: What is a mindset?Published on: 19 May 2022, 06:43 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments