1. आरोग्य सल्ला

औषध एक्सपायर होणं म्हणजे नेमकं काय?

औषध expire होतं म्हणजे नक्की काय होतं हेच लोकाना माहित नसतं.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
औषध एक्सपायर होणं म्हणजे नेमकं काय?

औषध एक्सपायर होणं म्हणजे नेमकं काय?

औषध expire होतं म्हणजे नक्की काय होतं हेच लोकाना माहित नसतं. औषध expire झालं म्हणजे त्यात विष तयार झालं यासारखे असे अनेक समज आहेत लोकांचे. तर औषध expire होतं म्हणजे त्याच्या लेबल वर त्याची जी स्ट्रेंग्थ लिहिलेली असते, (उदा. क्रोसिन वर लिहिलेले असते each tabletcontains paracetamol 500 mg, तर 500 mg ही झाली या औषधाची strength) ती ज्या दिवशी १०% ने कमी होते ती झाली त्या औषधाची expiry date!मुळात expiry date साठी वापरला जाणारे जे शास्त्रीय नाव आहे ते आहे t-90%. यातला t म्हणजे Time वेळ.

औषध जेव्हा 90% उरते (म्हणजेच १०% ने कमी होते) तो वेळ म्हणजेच expiry date. आता यावरूनच लक्षात येईल की बहुतेक वेळेला expiry date उजाडते तेव्हा त्यावर दिलेल्या dose पेक्षा औषधाची मात्रा कमी झालेली असते. त्यामुळे त्याचा परिणाम थोडा फार कमी होतो, तो शून्य होतो असे अजिबात नव्हे.वर दिलेल्या उदाहरणात १०% म्हणजे 500 पैकी 50 mg paracetamol कमी झाले तरी ४५० mg शिल्लक असतेच, आणि त्याचा परिणाम दिसून येतोच, पण तरीही expiry date नंतर औषधे शक्यतो घेऊ नयेत. त्याचे कारण असे- वरच्या उदाहरणात मी लिहिलंय की औषधाची strength १०% कमी होते. पण म्हणजे नक्की काय होतं? तर औषध हे शेवटी एक chemical आहे आणि काळानुसार ते हळू हळू chemical reactions मुळे degrade होते. हवेतील oxygen मुळे oxidation होऊन किंवा हायड्रोजनमुळे reduction होऊन किंवा सूर्यप्रकाशामुळे किंवा इतर असंख्य

chemical reactions मुळे हे औषध degrade होते आणि जसजसा वेळ जाईल तसतसे ते degrade होऊन त्याचे इतर पदार्थात रुपांतर होते.एका औषधाचे वेगवेगळ्या मार्गाने degradation होऊ शकते आणि त्यामुळे एकाच वेळी त्याची वेगवेगळीreaction products बनू शकतात. ही reaction products निरुपद्रवी असतील तर त्याचा परिणाम इतकाच होतो कि औषधाची strength कमी होते. पण कधी कधी मात्र ही reaction products अपायकारक असूही शकतात. अर्थात प्रत्येक औषधाचा अश्या प्रकारचा forced degradation study औषध कंपनीत केलेला असतोच आणि expiry date पर्यंत त्यात काहीही अपायकारक reaction product बनत नाही ना हे तिथे पहिलेच जाते, पण expiry date नंतरचा असा अभ्यास मात्र कंपनीने केलेला नसतो.

समजा औषधावर लिहिलेली expiry date २ वर्षे आहे. तर मग जो अभ्यास केला जातो तो या दोन वर्षांचाच असतो.पण समजा हे औषध दोन तीन वेगवेगळ्या degradation pathways ने degrade होते आहे, ज्यातला एक pathway अत्यंत संथ आहे, त्याचे reaction product ४ वर्षानंतर बनतेय आणि ते अपायकारक आहे, आणि असे औषध जर कुणी expiry date नंतर घेतले तर अपाय होऊ शकतो.देशात जिथे रुग्णांचे प्रमाण प्रचंड आहे तिथे ही गोष्ट लोकांना समजावून सांगणे कठीण आहे. शिवाय कुठले औषध expiry नंतर घेतले तर चालेल आणि कुठले नाही हे सांगणे ही कठीण आहे, कारण हजारो औषधे बाजारात आहेत. आणि म्हणूनच expiry date नंतर औषधे न घेणेच उत्तम.

English Summary: What exactly is a drug expiration? Published on: 29 June 2022, 12:26 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters