1. आरोग्य सल्ला

कोरोना विषाणूविषयी आपल्याला काय माहीत करून घेण्याची गरज आहे

कोरोना विषाणूविषयी समाजमाध्यमे, व्हॉट्सअप आणि इंटरनेट यावरून अनेक प्रकारची माहिती झपाट्याने पसरत आहेत. या माहितीपैकी काही माहिती खरी असेलही, पण या माहितींपैकी बऱ्याच प्रकारची माहिती निराधार आहे. कोरोनाविषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्याने पसरत असताना, या प्राणघातक विषाणूविषयीची काही वस्तुस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. विग्यान प्रसारमधील एक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टी.व्ही वेंकटेश्वरन त्यांच्या अनेक प्रकारच्या संशोधनाच्या आधारे आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत.

KJ Staff
KJ Staff


कोरोना विषाणूविषयी समाजमाध्यमे, व्हॉट्सअप आणि इंटरनेट यावरून अनेक प्रकारची माहिती झपाट्याने पसरत आहेत. या माहितीपैकी काही माहिती खरी असेलही, पण या माहितींपैकी बऱ्याच प्रकारची माहिती निराधार आहे. कोरोनाविषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्याने पसरत असताना, या प्राणघातक विषाणूविषयीची काही वस्तुस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. विग्यान प्रसारमधील एक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. टी.व्ही वेंकटेश्वरन त्यांच्या अनेक प्रकारच्या संशोधनाच्या आधारे आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत.

संसर्ग

या विषाणूचा घसा आणि फुफ्फुसाच्या सर्वात बाह्यस्तरात असलेल्या (epithelial cells) पेशींना संसर्ग होतो. सार्स-कोव्ह-२ घसा आणि फुफ्फुसांमध्ये आढळणाऱ्या मानवी पेशींवरील एस२ रिसेप्टर्सना चिकटतात. तुमच्या त्वचेवर एस-२ रिसेप्टर्स नसल्याने तिथे हे विषाणू निरुपद्रवी असतात. हा विषाणू नाकाची पोकळी, डोळे आणि तोंड यामधून शरीरात प्रवेश करतो. आपले हात या विषाणूचे प्रमुख वाहक असून ते या विषाणूला आपले तोंड, नाक आणि डोळे यांच्यापर्यंत पोहोचवायला मदत करतात. शक्य होईल तितके नियमित साबणाने हात वीस सेकंद धुत राहिल्यास या विषाणू संसर्गाला प्रतिबंध होतो. 

संसर्गकारक मात्रा

एका मकाकला (माकडाला) संसर्ग होण्यासाठी 7,00,000 पीएफयूची (प्लाक फॉर्मिंग युनिट) गरज होती. पीएफयू हे नमुन्यातील संसर्गाची मोजणी करण्याचे परिमाण आहे. जरी त्या प्राण्यामध्ये कोणतीही वैद्यकीय लक्षणे दिसत नव्हती, तरीही त्याच्या नाकातील आणि लाळेतील तुषारांमध्ये विषाणूंचा साठा होता. मानवाला संसर्ग होण्यासाठी 7,00,000 पीएफयूपेक्षा जास्त मात्रेची गरज असते. जनुकीय बदल केलेल्या एस-2 रिसेप्टर्स असलेल्या एका उंदरावर केलेल्या प्रयोगात असे आढळले की केवळ 240 पीएफयूद्वारे या उंदराला संसर्ग होत होता. त्या तुलनेत नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यासाठी 70,000 पीएफयू इतक्या मात्रेची गरज असते.

संसर्गाचा कालावधी

एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे किती काळामध्ये संक्रमण होऊ शकते हे अगदी अचूकपणे सांगता येणार नाही, पण साधारणपणे 10 ते 14 दिवसांचा हा कालावधी असतो. एकंदर संक्रमणांमध्ये घट करण्यासाठी कृत्रिम पद्धतीने संक्रमण कालावधी कमी करण्याची एक महत्त्वाची पद्धत आहे. रुग्णालयात दाखल करणे, अलगीकरण, लॉकडाऊन आणि विलगीकरण या अतिशय प्रभावी पद्धती आहेत.   

कोणाला संसर्ग होऊ शकतो

या विषाणूचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीकडून लक्षणे दिसण्यापूर्वीच दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो. अशा बहुतेक वाहकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसतही नाहीत. खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड झाकून घेतले तर संसर्गाचे प्रमाण कमी व्हायला मदत होऊ शकते. हा विषाणू, ज्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे त्या व्यक्तीमधील संपूर्ण संसर्गकाळात तिची लाळ,थुंकी आणि विष्ठा यामध्ये हा विषाणू अस्तित्वात असतो.

आपल्याला संसर्ग कसा होतो

बहुधा थेंबांवाटे संक्रमण होतो. यासाठी सहा फुटांपेक्षा कमी अंतरामधील अतिशय जवळून होणाऱ्या संपर्काची गरज असते. त्यामुळेच भाजी बाजार, सुपर मार्केट अशा सार्वजनिक ठिकाणी आपण एकमेकांपासून सुमारे 1.5 मीटर अंतरावर राहावे, अशी सूचना केली जाते. हाँगकाँगमध्ये केलेल्या संशोधनातून असे आढळले की सोशल डिस्टन्सिंग म्हणजे परस्परांपासून सुरक्षित अंतर राखल्याने फैलाव 44% नी कमी होऊ शकतो. आजाराचे निर्जिव व्हेक्टर फोन, दरवाजांच्या मुठी यांसारख्या पृष्ठभागांवर असतात आणि ते संक्रमणाचे प्रमुख स्रोत असू शकतात, मात्र याविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही. दाराच्या मुठींना, लिफ्टमधील बटणांना आणि सार्वजनिक ठिकाणी असलेले काउंटर यांना स्पर्श केल्यावर हातांना निर्जंतुक करणे सुरक्षित असते.

आपल्याकडून किती जणांना संसर्ग होऊ शकतो

संसर्ग झालेल्या एका व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होण्याची सरासरी संख्या म्हणजे मानवी संक्रमण पल्ला 2.2 ते 3.1 यांच्या दरम्यान आहे. म्हणजे संसर्ग झालेली एक व्यक्ती साधारणपणे 2.2 ते 3.1 व्यक्तींना संसर्ग पोहोचवू शकते. प्रत्यक्षात लोकांमध्ये अंतर राखून आपण वास्तविक संक्रमणात कपात करू शकतो आणि त्यामुळे संसर्गाचा दर कमी होऊ शकतो.

हा विषाणू कोठून आला

वटवाघळाच्या सूपामधून( पेयामधून) हा आलेला नाही. एकदा उकळल्यानंतर हा विषाणू निष्क्रिय होतो. सुरुवातीला असे समजले जात होते की सार्स-कोव्ह-2 (SARS-CoV-2) हा विषाणू वटवाघळातून मानवात आला. पण अलीकडेच केलेल्या जीनोम अभ्यासातून असे दिसून आले आहे की या विषाणूने वटवाघळातून मानवामध्ये झडप घालण्यापूर्वी एखाद्या मध्यस्थ प्रजातीचा वापर केला असावा. दुसऱ्या एका अभ्यासात असे सूचित केले जात आहे की सार्स- कोव्ह-2 (SARS-CoV-2) या विषाणूची साखळी या आजाराचा फैलाव होण्यापूर्वी मानवामध्ये पसरत जात होती.

याचा उगम कसा झाला

सार्स-कोव्ह-2 (SARS-CoV-2) हा विषाणू एकतर मानवामध्ये जैविक संक्रमणाद्वारे स्थलांतरित होण्यापूर्वी बिगर मानवी प्राणी आश्रयदात्याच्या विषाणूकारक नैसर्गिक निवडीद्वारे किंवा मानवामधील विषाणूकारक नैसर्गिक निवडीद्वारे जैविक संक्रमणाद्वारे सक्रिय झाला आहे. याविषयी आणखी जास्त अध्ययन केल्यावरच या दोहोंपैकी कोणती शक्यता योग्य आहे ते समजू शकेल. आपल्याला अजूनही हे नीट समजलेले नाही की मानवामध्ये संसर्ग आणि संक्रमण होऊ देणारी सार्स-कोव्ह-2ची म्युटेशन्स (संख्यावृद्धीकारक प्रक्रिया) कोणती आहेत.

सार्स-कोव्ह-2 कधी सक्रिय झाला

आपल्याकडे डिसेंबर 2019 पूर्वी सार्स-कोव्ह-2 या विषाणूसंसर्गाच्या प्रकरणांची कोणतीही कागदोपत्री नोंद नाही. मात्र, प्राथमिक जिनोमिक विश्लेषणानुसार सार्स-कोव्ह-2 या विषाणूसंसर्गाचे पहिल्या मानवी प्रकरणांची नोंद ऑक्टोबरचा मध्य आणि डिसेंबर 2019चा मध्य या दरम्यान झाली. याचा अर्थ असा आहे की प्राथमिक जैविक प्रक्रिया आणि फैलाव या दरम्यान संक्रमणाचा एक अज्ञात कालावधी होता. 

याचा संसर्ग प्राण्यांना होतो का

मॉलिक्युलर मॉडेलिंग असे सूचित करते की सार्स-कोव्ह-2 या विषाणूचा मानवाव्यतिरिक्त, वटवाघुळ, उंदीर, मांजर, माकड आणि डुकराच्या पेशींवर परिणाम होऊ शकतो. पाळीव प्राणी आणि दुभती जनावरे यांना संसर्ग होत नाही. अंडी किंवा कुक्कुट उत्पादने खाल्याने सार्स-कोव्ह-2 या विषाणूचा संसर्ग होत नाही.

एखाद्या व्यक्तीला दोनदा संसर्ग होऊ शकतो का 

आपल्याला एकदा गोवर आल्यावर बहुतेकांमध्ये त्यापासून आयुष्यभर रोगप्रतिकारक्षमता निर्माण होते. आपल्याला पुन्हा क्वचितच गोवर होऊ शकते. प्रयोगासाठी संसर्ग निर्माण केलेल्या मकाकमध्ये दुसऱ्यांदा संसर्ग निर्माण करता येत नसल्याचे दिसून आले. त्याच प्रकारे सार्स कोव्ह-2 च्या संसर्गातून बरे झालेल्या मानवांमध्ये पुन्हा संसर्ग झाल्याची उदाहरणे आढळलेली नाहीत. मात्र, ही रोगप्रतिकारक्षमता किती काळ टिकते हे अद्याप समजलेले नाही

यामुळे होणारा आजार किती तीव्र असतो

कोविड-19 म्हणजे मृत्यूदंड नाही. कोविड-19च्या बऱ्याच रुग्णांमध्ये (81%) याची तीव्रता सौम्य असते, सुमारे 15% लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते आणि 5% रुग्णांना अतिदक्षतेची गरज असते. म्हणजेच याचा संसर्ग झालेल्या बहुसंख्य लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची देखील गरज नाही.

याची सर्वाधिक झळ कोणाला पोहोचू शकते 

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची सर्वाधिक झळ पोहोचू शकते. इटलीमध्ये लोंबार्डी येथे रुग्णांवर उपचार करणाऱ्या 20% आरोग्य कर्मचाऱ्यांना याचा संसर्ग झाला. सर्वसामान्य जनतेमध्ये वयोवृद्ध विशेषतः 60 वर्षांवरील आणि हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि श्वसनसंस्थेचे विकार असलेल्या लोकांना यापासून सर्वात जास्त धोका असतो.

मृत्यूचे कारण काय असते 

बहुतेकदा श्वसनसंस्था निकामी झाल्यामुळे किंवा श्वसनसंस्थेवरील परिणामांच्या जोडीला हृदय निकामी झाल्यामुळे मृत्यू ओढवतो. फुफ्फुसामध्ये द्रवाची गळती (पाणी साठणे) होण्यामुळे श्वसनक्रियेवर परिणाम होतो आणि त्यामुळे मृत्यू होतो. सध्या कोविड-19 चे उपचार म्हणजे गरज भासल्यास व्हेंटिलेशनसह (कृत्रिम श्वसनयंत्रणेचा वापर) प्राथमिक पूरक काळजी घेतली जाते. याविषयी अनेक वैद्यकीय चाचण्या सुरू असून त्यांच्या निष्कर्षांची प्रतीक्षा आहे.

दुधाच्या पिशव्या, वर्तमानपत्रे यांच्याद्वारे या विषाणूचा फैलाव होतो का 

सार्स कोव्ह-2 हा विषाणू प्लॅस्टिक आणि स्टेनलेस स्टील या पृष्ठभागांवर तीन दिवसांपर्यंत राहू शकतो. ज्यावेळी या विषाणूचे प्रमाण 10,000 पीएफयू इतके होते तेव्हा तो वर्तमानपत्रे किंवा कापडावर केवळ पाच मिनिटे टिकून राहात होता. दुधाच्या पिशव्यांवरून हा विषाणू घालवण्यासाठी त्या धुवून घेणे पुरेसे असते.

हा विषाणू हवेतून पसरू शकतो का 

हवेमध्ये हा विषाणू केवळ 2.7 तास राहू शकतो. त्यामुळे घराची बाल्कनी, गच्ची यांसारख्या मोकळ्या जागांमध्ये वावरताना कोणताही धोका नसतो.

विषाणू संख्यावृद्धीकारक प्रक्रिया 

विषाणूच्या प्रमाणात वाढ होणाऱ्या अनेक प्रक्रिया ज्ञात असल्या तरी आतापर्यंत केलेल्या अध्ययनात या विषाणूच्या संक्रमणात बदल होण्याशी किंवा आजाराची तीव्रता वाढवण्याशी संबंधित असलेल्या म्युटेशन म्हणजे संक्रमण साखळीत वाढ करणाऱ्या प्रक्रिया आढळलेल्या नाहीत.

येऊ घातलेला उन्हाळा किंवा पावसाळा यांमुळे दिलासा मिळेल का

वातावरणातील तापमान किंवा आर्द्रता यांच्यातील वाढीमुळे या विषाणूच्या संक्रमणात घट होत असल्याचे कोणतेही भक्कम पुरावे अद्याप सापडलेले नाहीत.  

English Summary: what do we know and what do we need to know about novel coronavirus Published on: 03 April 2020, 01:05 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters