1. आरोग्य सल्ला

प्रवासात उलट्या होतात, मग करा हे उपाय

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
प्रवासात उलट्या होतात, मग करा हे उपाय

प्रवासात उलट्या होतात, मग करा हे उपाय

कधी गाड्यांमधील, कधी कॅन्टीनमधून, कधी छोट्या दुकानातून, तर कधी ढाब्यांवर. परंतु या सर्व ठिकाणी आपण स्वच्छतेच्या दृष्टीने फारच कमी प्राधान्य देतो आणि आपल्या चवीनुसार खातो. मग जेव्हा हे अन्न आपल्या पोटात जाते, तेव्हा मात्र लोकांना समस्यांना सामोरं जावं लागतं आणि मग अनेकांना पश्चाताप होतो. 

त्याच वेळी, जर तुम्ही गाडी किंवा बसमधून प्रवास केला तर तुम्हाला उलटी झाल्यासारखे वाटू लागते. उलटी होण्याआधी बऱ्याचदा लोकांना मळमळ आणि आम्लपित्तासारखे वाटते. परंतु आपण खालील उपाय कराल तर नक्कीच, उलट्या थांबवू शकता.उलट्या थांबवण्यासाठी टिप्स आलं खाल्ल्याने उलटी बंद होण्यास मदत मिळते.

तसेच तुम्ही आलं पाण्यात हलके गरम करूनही पिऊ शकता.बऱ्याच लोकांना लिंबू चोखल्याने उलट्या थांबण्यास मदत होते.एक कप गरम पाण्यात एक चमचा लवंग उकळून गाळून प्या. त्यामुळे प्रवासादरम्यान होणाऱ्या उलट्यांपासून आराम मिळतो.उलट्या होत असल्यास पाणी किंवा लिंबूपाणी प्या. परंतु हे पाणी थोडे-थोडे करुन प्या, एकावेळी भरपूर पाणी प्यायल्याने उलट्या वाढू शकतात.

मोठा श्वास घ्या आणि काही चांगल्या क्षणांचा विचार करण्याचा प्रयत्न करा. प्रवासादरम्यान मळमळ होत असल्यास ही पद्धत खूप प्रभावी आहे.संत्र्याचा रस पिल्याने किंवा संत्री खाल्ल्याने उलट्या थांबतात.एक चमचा बडीशेप एक कप पाण्यात 10 मिनिटे उकळल्यानेही उलट्या थांबतात.मीठ आणि साखरेचे पाणी प्यायल्याने आराम मिळेल.

 

 Nutritionist & Dietitian

 Naturopathist

 Dr. Amit Bhorkar

whats app: 7218332218

English Summary: Vomiting occurs during travel, so do this remedy Published on: 14 May 2022, 12:34 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters