कापराचा वापर औषध म्हणून केला जातो आणि याचं तेलही खूप फायदेशीर मानलं जातं. परंतु कापुर शुद्ध असायला हवा.
१) कापूर, ओवा आणि पेपरमिंट एक सारख्या प्रमाणात घ्या. त्यांना एका काचाच्या बाटली टाका. त्या बाटलीला उन्हात ठेवा. थोड्या-थोड्या वेळाने ती बाटली हलवत रहा.
त्यानंतर त्यातील चार थेंब बत्ताशावर किंवा साखरेच्या सरबतात टाका. हे जुलाब झालेल्या व्यक्तीला द्या. जुलाब थांबण्यास मदत होईल
२) पोटदुखी आणि अस्वस्थता यात कापूर खूप फायदेशीर आहे. पोटात दुखत असेल अशावेळी कापूर, ओवा आणि पेपरमिंट साखरेच्या सरबतात टाकल्यास पोट दुखी नाहिशी होते.
हे ही वाचा - वाढवायची दृष्टी तर, करा या थेरपी
३) त्वचेसाठी कापूर खूप फायदेशीर आहे. कापूर कोशिकांना मजबूत करतो. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
४) स्नायूतील दुखणे कमी करण्यात कापूरची मदत होते. स्नायू किंवा संधीवातचा आजार असल्यास कापूरचे तेलाने मालीश करा. आराम मिळू शकतो आणि दुखणे पळून जाते.
५) खाज आल्यास कापुराचा उपयोग करा. खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावल्यास, खाज बंद होते.
६) संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे. संधिवात कापूरच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो.
७) जळले किंवा भाजल्यास कापूराचं तेल खूप उपयोगी आहे. त्याने आग कमी होते.
८)शरीराचा एखाद्या भागात वेदना होत असतील तर कापराच्या तेलाने मसाज करा. असे केल्याने वेदना दूर होतील.
सांधेदुखीपासूनही सुटका मिळवायची असेल तर कापराचा उपयोग केला जाऊ शकतो.
९)तुमच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्या पाण्यात काहीवेळ पाय ठेवा.
१०)जर तुम्हाला जखम झालेली असेल किंवा कापलेलं असेल तर कापरामध्ये पाणी मिश्रित करुन त्या जखमेवर लावा. कापरात अॅंटीबायोटिक असतं जे जखम भरण्यास मदत करतं.
वरील प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
Nutritionist & Dietician
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app: 7218332218
Share your comments