corona Updates : सध्या देशात कोरोनाचे सत्र वाढतच आहे. मध्यंतरी शिथिल झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. मध्यंतरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या तब्बल सात हजाराच्या पार गेली होती. मात्र गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा या संख्येत वाढ झाली असून तब्ब्ल 8 हजार 329 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत देणारी रुग्णवाढ सगळ्यांचीच चिंता वाढवणारी आहे. सध्या देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजार 370 वर पोहचली आहे.आरोग्य मंत्रालयाने नुकतीच आकडेवाडी जारी केली त्यात मागील 24 तासात 4 हजार 216 लोक कोरोनामुक्त झाले असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही महिन्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. मात्र कालपर्यंत कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाली असून देशात एकूण बाधितांचा आकडा 4 कोटी 42 लाखांवर गेला आहे. तर मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही ५ लाख 24 हजार 747 इतकी आहे.
महाराष्ट्र राज्यातही कोरोना वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रातही 3 हजार 81 नव्या कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. फक्त मुंबई मध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. मुंबईतच १ हजार ९५६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मध्यंतरी मुंबई महापालिकेने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काही सूचना जारी केल्या होत्या.
आगोदर ऊस पेटवला आता सोडतायेत गुरे; अतिरिक्त उसाचा राडा काही संपेना
मुंबई महापालिकेचे महत्वपूर्ण निर्णय
मुंबईमध्ये कोरोना टेस्टची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. 12 ते 18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण वाढवण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी बुस्टर डोसची संख्या वाढवण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. शिवाय वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटर सज्ज करण्याचे आदेश दिले आहेत. मालाडमध्ये असलेलं जम्बो कोव्हिड सेटंर हे प्राधान्यांना उपलब्ध होणार आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास वारंवार सांगितले जात आहे.
वॉर रुम होणार सक्रीय
कोरोना काळात मुंबईतील प्रत्येक प्रभाग कार्यालयात वॉर रुम तयार करण्यात आल्या होत्या. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना आणि मदतीसाठी हे वॉर रुम तयार करण्यात आले होते. आपल्या हद्दीत कोणत्या रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत याची माहिती वॉर रुममध्ये ठेवली जाते. आता मुंबई महापालिकेच्या निर्देशानुसार, पुन्हा एकदा हे वॉर रुम सज्ज होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
न्यूझीलंड सरकारचा निर्णय, गुरांनी ढेकर दिल्यावर मालकांना भरावा लागणार कर, कारणही आले समोर...
5 वर्षांपूर्वी लोकांची शेती करणारा पठ्ठ्या आज बनला 16 एकराचा मालक,वाचा नेमकं केलं तरी काय
Share your comments