कोरोना आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आजारांचा प्रादुर्भाव सध्या होताना दिसत आहे. मंकीपॉक्स जगातील काही देशांमध्ये थैमान घालत असतानाच आता भारतातील ओडीसा आणि केरळ या राज्यांमध्ये टोमॅटो फ्लू या नवीन आजाराने दहशत निर्माण केली आहे.
केरळमध्ये सहा मे ला याचा पहिला रुग्ण आढळला होता. त्याच्यानंतर आतापर्यंत 82 लोकांना त्याची बाधा झाली आहे. तसेच ओडीसा देखील ही संख्या 26 पर्यंत आहे. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे हा आजार जास्त करून लहान मुलांना होत असल्याचे दिसून आले आहे.
नवजात बालक जास्त प्रमाणात या आजाराची शिकार होत आहेत. अजून पर्यंत एकाही मृत्यूची नोंद देशात झालेली नाही परंतु टोमॅटो फ्लूचा संसर्ग तीव्र स्वरूपाचा असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तीमध्ये यामुळे बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे.
टोमॅटो फ्लूची लक्षणे
1- संसर्ग झालेल्या रुग्णाच्या त्वचेवर पुरळ उठतात.
2- शरीराचे डिहायड्रेशन होते.
3- त्वचेला जळजळ किंवा खाज सुटते.
4- टोमॅटो सारखे अंगावर लालबुंद पुरळ येतात.
5- जास्त तीव्रतेचा ताप
6- शरीर आणि सांधे दुखतात.
7- सांध्यांना सूज येते.
8-पोटामध्ये पेटके आणि तीव्र वेदना होते.
9-मळमळ, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होतो.
10- खोकला, शिंका येणे तसेच नाक वाहते.
11- तोंड कोरडे पडते. तसेच थकवा जास्त प्रमाणात जाणवतो.
12- हाताच्या रंगामध्ये बदल होतो.
बचावासाठी कोणती काळजी घ्यावी?
1- संक्रमित झालेल्या लहान मुलाला उकळलेले स्वच्छ पाणी प्यायला द्या. जेणेकरून त्याचे शरीर हायड्रेटेड राहू शकेल.
2- मुलाला फोड किंवा पुरळ खाजण्यापासून थांबवा.
3- घरात आणि मुलांच्या आजूबाजूला स्वच्छता राहील याची काळजी घ्या.
4- कोमट पाण्याने अंघोळ करा.
5- बाधित मुलांपासून अंतर ठेवा व त्यांना सकस आहार जेवायला द्या.
6- वरील पैकी एक जरी लक्षण दिसले अरे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:सोयाबीन उत्पादकांना प्रतिएकर 2 हजार रुपये अनुदान द्या - डॉ. अनिल बोंडे
Share your comments