1. आरोग्य सल्ला

Tooth Pain:दात दुखी पळवायची असेल तर करा हे घरगुती उपाय, दातदुखी पळेल भुर्रकन

अचानक दात दुखीचा अनुभव आपल्यापैकी बहुधा सर्वांनाच कधीतरी येतो. साधारणपणे दात किडल्याने दात दुखी उद्भवते. आहार बदलती जीवनशैली यांसारख्या कारणांसह मानसिक तान तणावामुळे ही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy image - the james clinic

courtesy image - the james clinic

 अचानक दात दुखीचा अनुभव आपल्यापैकी बहुधा सर्वांनाच कधीतरी येतो. साधारणपणे दात किडल्याने दात दुखी उद्भवते. आहार बदलती जीवनशैली यांसारख्या कारणांसह मानसिक तान तणावामुळे ही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अशावेळी दुखणे कमी करण्याचे नैसर्गिक उपाय माहीत असलेले बरे.निसर्गातील अनेक वनस्पतींच्या वापराने दातदुखी कमी करता येते. उदा. मोहरी, काळे मिरे, लसूण आदी…

 दातांचे दुखणे सहजासहजी जात नाही. दात दुखीचा त्रास एकदा सुरू झाला की, दुर्लक्ष करून चालत नाही. दात दुखीचा त्रास सुरू झाला की डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. डॉक्टरांकडे लगेच जाणे शक्य नसेल तर काही घरगुती उपाय करून तात्पुरता आराम मिळवू शकता. दात दुखी हा लपलेला शत्रू असतो. कारण एकदा दात दुखायला लागले की धष्ट पुष्ट पहिलवान देखील लहान मुलांसारखा रडू लागतो.

1) मिठाच्या पाण्याचा चुळा भरणे :(Gargaling With Salt Mix Water)

 हलकीशी दात दुखी असेल किंवा दातांमध्ये काही अन्नपदार्थ अडकून दात दुखत असेल तर मिठाच्या पाण्याचा चुळा भरणे हा उत्तम उपाय आहे. मीठ हे डीसइनफेक्टन्ट असल्यामुळे दातातील किटाणू मारते.

2) मिरे पावडर :

 एक चतुर्थांश चमचा मिठात चिमुटभर मिरे पावडर मिसळून दुखणाऱ्या भागात लावावे. यामुळे नक्की आराम मिळेल.

3) बर्फाचा शेक :

 आईस बॅग किंवा एखाद्या रुमालात बर्फाचे तुकडे गुंडाळून दुखत असलेल्या दातांना बाहेरून शेक द्या बर्फाच्या थंडाव्याने तिथले रक्त गोठते आणि वेदना शांत होतात.

4) लसणीच्या कळ्या चावा :

 लसून हे जखम बरी करण्यासाठी वापरात येणारा आयुर्वेदिक पदार्थ लसणाचा पेस्ट करून दुखणाऱ्या दातावर लावा किंवा कच्चा लसूण चावून रस दुखणाऱ्या दाता जवळ न्या. असं केल्याने दात दुखीवर लवकर आराम मिळेल.

5) लिंबू हिंग :

 लिंबात विटामिन सी असते. जो दात दुखत आहे तेथे लिंबाच्या चकत्या ठेवल्याने ही आराम मिळतो. दात दुखीवर घरगुती उपाय करताना हिंग फायदेशीर ठरते. यामध्ये दात दुखी कमी करणारे गुण आढळतात. बॅक्टेरिया मुळे सडणाऱ्या दातांना वाचविण्यासाठी आणि दात दुखी पासून सुटका करण्यासाठी याचा उपयोग होतो. हिंग दातावर औषधाप्रमाणे काम करते.

6) बटाटा :(Potato)

 दात दुखी बरोबर सूज असेल तर बटाटा सोलून त्याच्या चकत्या करा आणि दुखणं असलेल्या जागेवर 15 मिनिट ठेवा. यामुळे आराम मिळेल.

7) पुदिन्याचे तेल :(Oil Of Peppermint)

 पेपरमिंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब दुखत्या दातावर टाकल्याने आराम मिळतो.

8) तेजपत्ता :

 तेजपत्ता प्राकृतिक वेदनाशक आहे. दुखण्यापासून त्वरित आराम मिळण्यासाठी त्याचा वापर केला जातो.त्यात अनेक औषधांचे गुणधर्म आहेत.

दातांची सडन आणि दुर्गंधी ते दूर करते. असे केल्याने दात दुखी पासून सुटका मिळते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Pawars Opinion:छोटे-मोठे कर्ज घेणाऱ्यांनी व्याजासह ते कर्ज वेळेत परत केले तरच सहकार क्षेत्राला येईल बळकटी

नक्की वाचा:Mansoon 2022: मान्सून संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; या तारखेला मान्सून येणार महाराष्ट्रात; वाचा

नक्की वाचा:7th pay commission ! सरकारच्या 'या' निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा

English Summary: this remedies useful in toothpain apply this remedies get rid from pain Published on: 14 May 2022, 10:40 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters