कर्करोग वाढला, हृदय विकार वाढले, किडनी फेल वाढले, बिपी वाढले, मधुमेह वाढले आणि डिप्रेशन तर सामान्य झाले. ह्याचे मुख्य कारण काय? जो तो येतो हे बोलती कि हे खाल्ल्याने तसे ते खाल्याने तसे झाले, काही नाही सापडले तर व्यसनांवर बोट ठेवायला मोकळे. मुख्य मुद्दा गेला कुठे? अगोदरच्या काळात तेलकट खाऊन हृद्य विकाराचा झटका आला हे ऐकण्यात येत नव्हते तर जास्तीत जास्त गेस व्हायची. गोड खाऊन मधुमेह झाला असे ऐकण्यात येत नव्हते तर जास्तीत जास्त दात दुखी व्हायची ती देखील जास्त गोड खाल्यामुळे. व्यसने होती पण कुणाला कर्करोग झाला किंवा लिव्हर खराब झाले असे ऐकण्यात येत नव्हते. मग आता काळ जसा प्रगत होत गेला तसे आजार कसे वाढायला लागले?
अजून नीट अभ्यास केला तर असे दिसून येईल कि जोपर्यंत कामगार कायदे मजबूत होते, नोकरदार योग्य वेळेस घरी यायचे, कंपनी किंवा कारखान्याच्या जवळ घर असायचे, पगार चांगला होता, महागाई कमी होती तोपर्यंत इतके आजारपण वाढले नव्हते मग आता असा काय चमत्कार झाला कि आजारपण वाढले, फार्मा कंपन्या आणि हॉस्पिटल चा नफा प्रचंड वाढला?
आधी पण आजार होते ते नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीने बरे होवून जायचे, जास्तच काही झाले तर डॉक्टर कडे जावे लागायचे व तिथे जावून देखील लवकर बरे व्हायचे, खूप कमी प्रमाणात ऑपरेशन ची वेळ यायची मग आताच कसे काय प्रमाण वाढले?
आता तुम्हाला समजलेच असेल कि आजारपणाचे मूळ कारण काय ते. नाही समजले, ठीक आहे मी सांगतो.
मानसिक तणाव वाढला. कसा काय? महागाई वाढली त्या प्रमाणात पगार नाही वाढला, कामाचा वेळ वाढला, कामापासून जवळ घरांच्या किमती गगनाला भिडल्या, जे विक्रोळी वरून कुलाबाला कामाला जायचे ते आता अंबरनाथ, बदलापूर वरून कामाला जावू लागले म्हणजे येण्या जाण्याचे ४ तास पकडा. अगोदर शेजारी एकत्र असायचे, वेळप्रसंगी कामी यायचे पण नातं त्यांच्या कामाच्या वेळा देखील बदलल्या, एक सकाळी कामाला तर दुसरा रात्री मग भेटणार कधी? सुट्टी ची शाश्वती नाही, सुट्टी च्या दिवशी देखील कामाला जावे लागेल.
खर्च इतका वाढला कि काम करणे गरजेचेच आहे त्याला पर्यायच नाही. जितके काम देईल ते करावेच लागेल नाहीतर दुसरीकडे नोकरी मिळणार कि नाही ह्याची शाश्वती नाही. म्हणजे निवांत वेळच उपलब्ध नाही. साधी झोप नाही भेटत तर बाकी तर दूरच राहिले.
महागाई, कामावरील मानसिक तणाव, घरखर्च, डॉक्टर हॉस्पिटल चा खर्च आणि कसलीही शाश्वती नाही ह्यामुळे मानसिक तणार येणार नाही तर काय होणार? एखादी व्यक्ती किती सहन करेल? चला मान्य केले कि काही लोक असतात मानसिक दृष्ट्या सक्षम पण सर्वच नसतात ना? आणि कुठेतरी अतिरेक केला तर मानसिक दृष्ट्या सक्षम व्यक्ती सुद्धा मानसिक तणावात जाईलच ना?
अगोदर व्यक्ती हि घरचेच जेवण खायची अगदी नाश्ता सुद्धा पण आता इतके व्यस्त जीवन खाजगी कंपन्यांनी करून टाकले कि कश्यालाच वेळ भेटत नाही, जे काही खाणे चालू आहे ते सर्व बाहेरचे. आता जेव्हा मी सकाळी दुध आणायला जातो तेव्हा पालकांची झुंबड हि बेकरी मध्ये असते, तिथे ते डब्बा उघडतात आणि इडली वडे बिस्कीट वगैरे मुलांना मधल्या सुट्टीत खाण्यासाठी घेतात.
म्हणजे ना मानसिक आणि ना हि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, ना स्वतःच्या आणि ना हि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ उरला आहे. काय साध्य केले ह्या जीवनशैलीने? नुसते मानसिक आणि शारीरिक आजारपण? आणि हॉस्पिटल चे कमीत कमी बिल किती? तर दहा हजार आता बोला सर्वसामान्य पगार हा वीस हजार आहे तिथे लोक हॉस्पिटल चे बिल भरणार कुठून? जर २० हजार च्या पुढे तुम्हाला पगार असेल तर तुम्ही नशीबवान आहात.
अगोदर पगार कमी पण मानसिक शांती होती, आता पगार जास्त आणि त्यापेक्षा जास्त खर्च, जरी खर्च पूर्ण होत असेल तरी मानसिक शांती नाही इतके धकाधकीचे जीवन बनवून ठेवले आहे. कर्मचाऱ्यांना कमी पगार आणि मालकांना, गुंतवणूकदारांना जास्त नफा. काम देखील जास्तीत जास्त कंत्राटी
मग कोणीतरी येणार आणि बोलणार कि हे सर्व माया आहे, तुम्ही इथे लक्ष नका देवू, सर्व सोडून टाका वगैरे वगैरे. अरे पण जगायचे कसे? निसर्गाचा नियम काय सांगतो? जगण्यासाठी धडपड करा, मग तेच करणार ना कि १३५ करोड लोकांनी सर्व सोडून जंगलात, हिमालयात जायचे? इथे जर इतकी लोकसंख्या झाली तर करायचे काय? जर लोक उपाशी राहिले तर बंड करून उठतीलच ना. जर काही नाही झाले तर तुमच्यावर नाव ढकलणार, तुम्ही कामे जास्त करता, सतत पैश्यांचा विचार करता, तुम्ही व्यसने करता वगैरे वगैरे. मूळ समस्या आहे तिथेच आहे ना?
आजकालची जीवनशैली हि मानसिक आणि मनोशारीरिक आजारांसाठी अगदी सुपीक आहे आणि त्यामध्ये लहान मुलांना देखील मानसिक आणि शारीरिक आजार होऊ लागले इतकी सुपीक आहे.
ह्याला पर्याय एकच कि तुम्ही काहीही करून आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या आणि त्यानंतर शारीरिक आरोग्याकडे, भले पगार कमी भेटला तरी चालेल पण तुम्हाला तुमचा वेळ हा भेटलाच पाहिजे. जे तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी व्हाल तेव्हा नव नवीन कल्पना वापरून तुम्ही अजून पैसा कमवू शकतात. तुमच्या क्षमतांचा पूर्ण वापर करू शकतात. सर्वकाही शक्य आहे फक्त तुमचे मानसिक आरोग्य हे सुस्थितीत राहिले पाहिजे.
स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही करू शकतात. तुमचे आयुष्य तुम्ही बदलू शकतात. ध्यान करा, मानसिक शांततेसाठी जे जे आवश्यक आहे ते ते करा. शारीरिक आरोग्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करा. बाकी काहीही मदत लागली तर मी आहे तुच्यासोबत, समुपदेशन आणि कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत, निश्चिंत रहा, स्वतःसाठी जगायला शिका.
अश्विनीकुमार
इंस्टाग्राम : aaple.aantarman
युट्युब चैनल : https://www.youtube.com/channel/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg
Share your comments