1. आरोग्य सल्ला

Non Vegetarian Diet: मासे आहेत आरोग्यासाठी चांगले, परंतु कोणते? हे ही आहे महत्वाचे,वाचा महत्वाची माहिती

समाजामध्ये बरेच लोक मांसाहार करतात. जर आपण मांसाहारी लोकांच्या आवडीचा विचार केला तर काहींना मटण, चिकन तर बऱ्याच जणांना मासे खूप आवडतात. तसे पाहायला गेले तर मांसाहाराचा विचार केला तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि शरीराच्या बळकटीकरणासाठी मांसाहार हा आवश्यक आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
fish is so important for health and fitness

fish is so important for health and fitness

समाजामध्ये बरेच लोक मांसाहार करतात. जर आपण मांसाहारी लोकांच्या आवडीचा विचार केला तर काहींना मटण, चिकन तर बऱ्याच जणांना मासे खूप आवडतात. तसे पाहायला गेले तर मांसाहाराचा विचार केला तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि शरीराच्या बळकटीकरणासाठी मांसाहार हा आवश्यक आहे.

आता नॉनव्हेज मध्ये जर आपण माशाचा  विचार केला तर माशामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु यामध्ये काही माशांचे प्रकार आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यातील काही माशांच्या प्रकाराबद्दल आपण माहिती घेऊ.

 माशांचे आरोग्यासाठी फायदेशीर प्रकार

1- क्रेफिश- क्रेफिश हे लहान लॉबस्टरसारखेच असून शिजवल्यावर ते चमकदार लाल होतात आणि खाताना खूप चवदार आणि रसदार लागतात.या माशांच्या प्रजाती मध्ये फॅटचे प्रमाण कमी असते. या माशांच्या प्रजातीमध्ये विटामिन बी आणि झिंक, मॅग्नेशियम, लोह, फास्फोरस आणि कॅल्शियम यासारख्या खनिजांचे

 प्रमाण जास्त असते.

नक्की वाचा:तुमच्या शरीरातील कॅल्शियम कमी झाले आहे असे वाटतं असेल तर फक्त करा हे उपाय!

2- ट्राऊट- ताज्या पाण्यातील ट्राउट मासा खाणे नेहमीच आरोग्यासाठी सर्वोत्तम असते. या माशांमध्ये omega-3 फॅट असतात.हृदयाच्या आरोग्यासाठी हा मासा फायदेशीर आहे.

3- ट्यूना- हा मासा विटामिन बी 12 आणि डी ने समृद्ध आहे. तसेच या माशांमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि लोह आहे.

या माशांमध्ये कमी चरबीयुक्त प्रोटीन असते तसेच लहान मुले आणि गर्भवती महिलांना ट्यूना माशाच्या हलक्या जाती खाण्याचा सल्ला दिला जातो.

परंतु यामध्ये कॅन केलेल्या ट्यूनामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते म्हणून तूम्ही मिठाचे सेवन नियंत्रित पद्धतीने करत असाल तर कॅन केलेला ट्यूना आरोग्यादायी पर्याय असू शकत नाही.

नक्की वाचा:व्हिटॅमिन सीचा स्त्रोतलिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी ! जाणुन घेऊ वापर

4- सॉर्डीन- हा एक तेलकट मासा असून यामध्ये विटामिन चे प्रमाण जास्त आहे. हा मासा त्वचा आणि हाडांसह खाल्ला जातो. त्याचे अनेक फायदे मिळतात.

हृदयरोगापासून संरक्षण, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगापासून बचाव आणि हाडे मजबूत करण्यास हा मासा मदत करतो.तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

नक्की वाचा:वाढत्या वयात शरीरात अनेक आजार आणि त्रास जाणवतोय? मग करा हे उपाय

English Summary: this is some kind of fish is so important for health and fitness Published on: 17 July 2022, 08:05 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters