1. आरोग्य सल्ला

व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत ‘लिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी ! जाणुन घेऊ वापर

व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत असलेले ‘लिंबू’ हे फळ अनेक रोगावर अत्यंत गुणकारी आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत ‘लिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी ! जाणुन घेऊ वापर

व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत ‘लिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी ! जाणुन घेऊ वापर

व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत असलेले ‘लिंबू’ हे फळ अनेक रोगावर अत्यंत गुणकारी आहे. पण त्याचा योग्य वापर केल्यास च त्याचा चांगला फायदा होतो तर आपण त्याचा वापर कसा करावा हे जाणून घेऊ1- लिंबू कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा.2-अजीर्ण झाल्यास लिंबू कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून कोमट करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो.

3- पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत प्यावे. त्याने भूक वाढते आणि अन्न नीट पचते.4 -आरोग्य व सौंदर्य रक्षणासाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याने चेहरा धुवावा. कांती तेजस्वी होते आणि सुरकुत्या नाहीशा होतात. त्वचेचा रुक्षपणा निघून जातो.5- रस काढल्यानंतर लिंबाची साल फेकून देवू नये. ती चेहऱ्यावर दोन्ही हातांनी नाजूकपणे घासावी. असे केल्याने रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि सौंदर्य खुलते.6 -लिंबाच्या सालीमध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे मुरुमापासून बचाव होतो.

7 - गुडघे, कोपर काळवंडले असतील तर थोडा मध लावून लिंबाच्या सालीने त्या भागावर मसाज करावा. काळवंडलेपणा निघून जातो.8 - लिंबाच्या सालीने पायाची, हाताची नखे साफ घासल्याने, ती स्वच्छ होतात आणि त्यांना चकाकीही येते.9 -फ्रिजमध्ये दुर्गंधी येत असेल तर, लिंबाच्या साली ठेवाव्या. यामुळे दुर्गंधी कमी होते.10 -शेगडीवरचे चिकट, तेलकट डाग काढण्यासाठीही लिंबाची साल उपयोगी पडते.11- लिंबाच्या सालीचा किस हा ‘लेमन झेस्ट’ म्हणून ओळखला जातो. सॅलेड किंवा अनेक पदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही ‘लेमन झेस्ट’चा वापर करू शकता.12 - लिंबाची साल वाळवून त्याची पावडर करून फेसपॅकमध्ये तिचा वापर करू शकता.

लिंबू कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा.अजीर्ण झाल्यास लिंबू कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून कोमट करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो.पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत प्यावे. त्याने भूक वाढते आणि अन्न नीट पचते.आरोग्य व सौंदर्य रक्षणासाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याने चेहरा धुवावा. कांती तेजस्वी होते आणि सुरकुत्या नाहीशा होतात. त्वचेचा रुक्षपणा निघून जातो. 

 

संकलन- निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९

English Summary: Lemon, a source of Vitamin C, cures many problems including immunity! Learn to use Published on: 12 July 2022, 11:03 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters