सध्याचे जीवन हे खूप धावपळीचे आणि दगदगीचे झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन कामाच्या कचाट्यापासून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाही. तसेच माणसाचे अपेक्षा आणि इच्छा माणसाला कुठल्याच बाबतीत स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे या सगळ्या धावपळीचा आणि दैनंदिन व्याप इत्यादी गोष्टींचा मनावर खूप मोठा तणाव येतो.
जर माणसाची मानसिक आरोग्य बिघडले तर त्याचे कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही. कामावरून तर लक्ष उडते.परंतु एकंदरीत कौटुंबिक वातावरणात देखील चिडचिड होते व कौटुंबिक वातावरण बिघडते. त्यामुळे कौटुंबिक कलह सुरू होतात आणि मानसिक आरोग्य जास्त खालवत जाते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मानसिक आरोग्याचा थेट परिणाम हा शारीरिक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे शारीरिक आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे मन शांत व तनाव विरहीत राहणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपण या लेखामध्ये मनावरील प्रेशर म्हणजेच ताणतणाव दूर करण्यासाठी काही छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टी विषयी माहिती घेऊ.
नक्की वाचा:World Mental Health Day: आज जागतिक मानसिक आरोग्य दिन; जाणून घ्या महत्वाच्या 'या' 6 गोष्टी
हे उपाय ठरतील तणाव दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कुटुंबाशी आणि मित्रांशी जवळीक करा- जेव्हा मानसिक स्थिती किंवा तणाव येतो तेव्हा बरेच जण एकटे राहण्याचा प्रयत्न करतात. जास्त करून कुणामध्ये मिसळत नाही. परंतु या गोष्टीमुळे आणखीनच नैराश्यात माणूस जात राहते.
त्यामुळे एकट्या राहणा-या ऐवजी आपल्या जवळच्या मित्रांना किंवा कुटुंबातील आपल्या सगळ्या घरच्यांना भेटणे व शक्य तितके त्यांच्यासमवेत राहण्याचा प्रयत्न करावा व त्यांच्या सोबत गप्पा माराव्यात. जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवावा त्यामुळे देखील तणावापासून मुक्तता मिळण्यास मदत होते.
2- योगाचा किंवा व्यायामाचा आधार घ्या- जर तुम्ही नियमितपणे योगासने आणि व्यायाम केला तर ताण तणाव दूर करण्यासाठी यांची खूप मदत होते. यासोबतच शांतपणे ध्यानधारणा करणे देखील महत्वाचे असून हलकासा व्यायाम देखील करणे तितकेच फायद्याचे आहे.
3- कामात व्यग्र राहण्याचा प्रयत्न करा- बरेचदा माणूस ताणतणावात असताना स्वतःला दैनंदिन कामापासून देखील दूर करते. परंतु असे न करता कितीही प्रॉब्लेम असेल तरी काहीतरी पॉझिटिव कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणे खूप आवश्यक आहे.
तुमचा फोकस हा त्या कामावर गेला तर इतर नकारात्मक विचार आणि काही गोष्टींवरून लक्ष बाजूला जाते व मनात येणारे नकारात्मक विचार हळूहळू दूर होतात.
4- संगीत ऐकणे- समजा तुम्ही एखाद्या गोष्ट मुळे खूप तणावात असाल तर तुम्ही त्या गोष्टीविषयी विचार करणे सोडून तुमचे आवडते गाणे ऐका किंवा तुम्हाला जर नाचता येत असेल तर तुम्ही नाचायचा प्रयत्न करा. या गोष्टीमुळे देखील तणावापासून मुक्तता मिळते.
5- आरोग्यदायी अन्नाचे सेवन करा- जेव्हा मानसिक निराशा असते.तेव्हा जेवण देखील व्यवस्थित करत नाही परंतु असे न करता सगळ्या गोष्टींचा दबाव सोडून अधिकाधिक संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण याचा सकारात्मक परिणाम हा मनावर आणि शरीरावर होतो आणि तणाव दूर होण्यास मदत होते.
Share your comments