1. आरोग्य सल्ला

'हे'छोटेसे आणि सोपे उपाय करा आणि डोकेदुखी कायमची पळवा

डोकेदुखी ही आजकाल प्रत्येकाची सर्वात सामान्य समस्या आहे.डोके दुखणे हे आपण घेतलेल्या कोणत्याही चुकीच्या पावलाचा अंतिम परिणाम आहे.डोकेदुखी मुख्यत्वे आहाराच्या सवयी, कॅफीन किंवा वातयुक्त पेयांचे अतिसेवन, चुकीची जीवनशैली, निद्रानाश, तान तनाव आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट चा अति वापर यामुळे होतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this is small and so easy remedies in headache and migrain

this is small and so easy remedies in headache and migrain

डोकेदुखी ही आजकाल प्रत्येकाची सर्वात सामान्य समस्या आहे.डोके दुखणे हे आपण घेतलेल्या कोणत्याही चुकीच्या पावलाचा अंतिम परिणाम आहे.डोकेदुखी मुख्यत्वे आहाराच्या सवयी, कॅफीन किंवा वातयुक्त पेयांचे अतिसेवन, चुकीची जीवनशैली, निद्रानाश, तान तनाव आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट चा अति वापर यामुळे होतो.

जेव्हा आपल्याला डोकेदुखीचा त्रास गंभीर स्वरूपात सुरू होतो तेव्हा आपण त्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी पेन किलर औषधांचे सेवन करतो. एक सोपा उपाय असला तरी मानवी शरीरासाठी वाटतो तितका सुरक्षित नाही. या पार्श्वभूमीवर आपण या लेखात काही छोटेसे आणि सोपे उपाय बघू ज्यामुळे डोकेदुखी बंद होते.

 डोकेदुखी वर उपाय

1- भरपूर पाणी प्या-अपुरे पाणी प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास होतो. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, डिहायड्रेशन मुळे देखील तनाव, डोकेदुखी आणि मायग्रेनचे एक कारण आहे. वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे की पाण्याचे सेवन केल्याने लोकांना 30 मिनिटे किंवा तीन तासाच्या आत डोकेदुखीपासून मुक्ती मिळू शकते.

नक्की वाचा:Health Menu:भाजलेल्या कांद्यांचे असेही आहेत आरोग्याला फायदे, वाचून वाटेल आश्चर्य

2- मॅग्नेशियम पूरक आहार घ्या- मॅग्नेशियम हे खनिज आहे जे शरीरातील असंख्य कार्यासाठी आवश्यक आहे. यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे आणि मज्जातंतूंचे संक्रमण समाविष्ट आहे.

तेदेखील अभ्यासाच्या मदतीने सिद्ध झाले आहे की योग्य मॅग्नेशियमच्या सेवन डोकेदुखी कमी करण्यासाठी  उपयुक्त आहे. दररोज 600 मिलीग्राम ओरल मॅग्नेशियम साइट्रेटचा उपचार केल्यास मायग्रेन डोकेदुखी ची वारंवारता आणि तीव्रता कमी होण्यास मदत होते.

3-हिस्टमाईन जास्त असलेले पदार्थ खाणे टाळा-हिस्टामाईन एक रसायन असून शरीरात नैसर्गिक रित्या आढळते. रोगप्रतिकारक, पाचक आणि मज्जासंस्था सुधारण्याचे प्रमुख भूमिका बजावते.

हे आंबवलेले अन्न, बियर, वाईन, स्मोक्ड फिश इत्यादी पदार्थांमध्ये आढळते. काही अभ्यासकांच्या मदतीने हे सिद्ध झाले आहे की, हिस्टामाईनचे सेवन केल्याने त्याच्याशी संवेदनशील असलेल्या व्यक्तींना मायग्रेन होऊ शकतो.

नक्की वाचा:मोठी बातमी! जगातून कॅन्सर होणार गायब! कॅन्सरवर औषध सापडले, ट्रायलमध्ये कॅन्सर रुग्ण पूर्णपणे रोगमुक्त

4- अत्यावश्यक तेल लावा- अत्यावश्यक तेलांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पतीचे सुगंधी संयुगे असतात.विविध आवश्यक तेलांमध्ये अनेक उपचारात्मक फायदे आहेत.

असे काही आवश्यक तेल आहेत ज्यामध्ये डोकेदुखी नियंत्रित करण्याचे गुणधर्म आहेत. यामध्ये पेपरमिंट आणि लैवेंडर आवश्यक तेल आहेत. ही तेले लावल्याने डोकेदुखीपासून मुक्ती मिळते किंवा तिची तीव्रता कमी होते.

5- अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा- मद्यसेवन नियमितपणे करणाऱ्या सर्व लोकांमध्ये डोकेदुखी होऊ शकत नाही. तरीही अभ्यासाने सिद्ध झाले आहे की, ज्यांना वारंवार डोके दुखीचा त्रास होतो त्यापैकी सुमारे एक तृतीयांश अल्कोहल मायग्रेन ला कारणीभूत आहे.

अल्कोहोल मुळे अनेक लोकांमध्ये तनाव आणि क्लस्टर डोकेदुखी देखील होऊ शकते.डोकेदुखी हा रक्तदाबाच्या औषधं सारख्या वासोडीलिटरचा देखील एक सामान्य परिणाम आहे.

अल्कोहोल देखील लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून कार्य करते. त्यामुळे वारंवार लघवी होणे यामुळे शरीरातील द्रव्य आणि इलेक्ट्रोलाईट नष्ट होतात. द्रव्य पदार्थ कमी झाल्यामुळे होणारे निर्जलीकरण झाल्यामुळे कधीकधी डोकेदुखी वाढवू शकते.

नक्की वाचा:भोपळ्याचा रस ठरला वरदान! अनेक रुग्णांना झाला फायदा, वाचा आश्चर्यजनक फायदे

6- पुरेशी झोप घ्या- झोप न लागणे हे डोकेदुखीचे एक प्रमुख कारण आहे आणि ते अनेक प्रकारे आरोग्यासाठी हानीकारक असू शकते. यामुळे काही लोकांमध्ये डोकेदुखी देखील होते.

एका अभ्यासात ज्यांनी रात्री सहा तासांपेक्षा कमी झोप घेतली आणि ज्यांनी नीट झोप घेतली किंवा जास्त वेळ झोपले त्यांच्यामध्ये डोकेदुखीची वारंवारता  आणि तीव्रता त्याची तुलना केली.

तेव्हा असे आढळून आले की, जास्त झोप घेणे देखील डोकेदुखीला कारणीभूत असल्याचे दिसून आले म्हणून जे डोकेदुखीवर उपाय शोधत आहेत अशा व्यक्तींनी झोप व्यवस्थित देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

English Summary: this is small and so easy remedies in headache and migrain Published on: 18 June 2022, 04:01 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters