मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते, तसेच त्यांनी असे अन्न खाऊ नये, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होईल. मधुमेह असणाऱ्यांना त्यांच्या जीवनशैलीतही फिटनेस ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी उच्च फायबरयुक्त पदार्थ, कार्ब्स आणि प्रथिने यांसारखी पोषकतत्त्वे संतुलित प्रमाणात घ्यावीत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 2030 पर्यंत, मधुमेह हा जगातील 7 व्या क्रमांकाचा सर्वात प्राणघातक रोग बनेल. लीसेस्टर युनिव्हर्सिटीने काही वर्षांपूर्वी एक संशोधन केले होते, या संशोधनातून अशा भाज्या समोर आल्या आहेत जे तुमच्या डायबिटीजवर नियंत्रण आणेल. जर तुम्ही रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या घेतल्या तर टाइप 2 मधुमेहाचा धोका 14% कमी होतो. अशा भाज्या आता पाहूयात.
1. कोबी -
कोबी हा उच्च फायबर आहार आहे ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. ही पानं शिजवण्याआधी नीट धुवून घ्यावीत आणि तेलात तळण्याऐवजी सल्ल्यानुसार आणि सूपप्रमाणे खावीत याची विशेष काळजी घ्या.
2. केल (Kale) -
केल ही एक अशी हिरवी भाजी आहे जे इतर भाज्यांच्या तुलनेत भारतात फार कमी वापरले जाते. हे उच्च फायबर असलेले अन्न आहे जे जास्त काळ उपासमार होऊ देत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी देखील वाढवत नाही.
3.पालक -
हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक हे औषधी गुणधर्माने समृद्ध मानले जाते. हा फायबरचा समृद्ध स्रोत आहे जो रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करतो. यामध्ये असलेले मॅग्नेशियम मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करते. पालकामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
महत्वाच्या बातम्या:
लवकरचा पाऊस शेतकऱ्याच्या मुळावर, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना
चिंता वाढली : देशात नवे संकट...
Share your comments