हृदयविकार नेमका कसा ओळखायचा, इथंपासून ते त्याचे प्रकार, उपचार नि त्याची इत्यंभूत माहिती असणं आवश्यक आहे.खराब जीवनशैली, अनियमित खाणं, तेलकट-मसालेदार पदार्थांचं सेवन, व्यायाम न करणं, दिवसभर बसून राहणं, शारीरिक हालचाली कमी असणं किंवा नसणं, लठ्ठपणा, अति धूम्रपान, मद्यपान, तणाव, चिंता या कारणांमुळं हृदयविकाराचा ((Heart Attack)) धोका वाढत जातो.हृदयविकाराची लक्षणे– छातीत सौम्य वेदना किंवा ठराविक दुखणं, व्यायाम केल्यानंतर धडधड वाढणं.– उलटी किंवा मळमळ होत असल्यास बऱ्याच वेळा पित्ताचा त्रास म्हणून सोडून देतो. पण तो हृदयापासून असू शकतो.– काही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येणं– छातीवर दाब येणं, छाती आवळल्यासारखी वाटणं, वेदना जबड्यावर किंवा मानेवर आणि डाव्या हातावर जाणं.
– श्वास घेण्यासाठी (दम लागणं) जास्त प्रयत्न करावा लागणं.– काहीही श्रमाचं काम न करता, अचानक घाम येणं.– कोणत्याही कारणाशिवाय कोरडा खोकला येत राहणं.– चेहरा फिका पडणं, कसंतरी वाटणं, खूप भीती वाटणं.अशी घ्या काळजी– वजन नियमित तपासत राहा, विनाकारण वाढू देऊ नका. लठ्ठ लोकांनी नियमित व्यायाम करायलाच हवा.– रोजच्या आहारात जास्तीत जास्त सकस पदार्थ खा. उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर मिठाचे सेवन कमी करा.– जास्त कॉफी प्यायल्याने रक्तदाब वाढतो, जो हृदयासाठी चांगला नाही.– मधुमेह असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यांनी खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावं.– डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधं घेऊ नका.– चालताना किंवा धावताना हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता आढळल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी.
अगदी लहान वयात हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतो.. हृदयविकार नेमका कसा ओळखायचा, इथंपासून ते त्याचे प्रकार, उपचार नि त्याची इत्यंभूत माहिती असणं आवश्यक आहे.खराब जीवनशैली, अनियमित खाणं, तेलकट-मसालेदार पदार्थांचं सेवन, व्यायाम न करणं, दिवसभर बसून राहणं, शारीरिक हालचाली कमी असणं किंवा नसणं, लठ्ठपणा, अति धूम्रपान, मद्यपान, तणाव, चिंता या कारणांमुळं हृदयविकाराचा ((Heart Attack)) धोका वाढत जातो.हृदयविकाराची लक्षणे– छातीत सौम्य वेदना किंवा ठराविक दुखणं, व्यायाम केल्यानंतर धडधड वाढणं.– उलटी किंवा मळमळ होत असल्यास बऱ्याच वेळा पित्ताचा त्रास म्हणून सोडून देतो. पण तो हृदयापासून असू शकतो.– काही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येणं
Share your comments