
पोटात पाणी होण्याची ही आहेत कारणे, आधीच घ्या काळजी
पोटात पाणी होणे ह्या आजाराला वैद्यकीय भाषेत Ascites असे म्हणतात. या विकारात पोटात पाणी जमा होऊ लागते. पोटात पाणी जमा होण्याची कारणे, लक्षणे, त्रासाचे निदान आणि त्यावरील उपचार याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.पोटात पाणी का व कशामुळे होते ?प्रामुख्याने यकृत सिरोसिसमुळे पोटात पाणी जमा होण्याची समस्या होते. सिरोसिसमुळे यकृताचे कार्य बिघडते तसेच यामुळे पाचक अवयवांकडून यकृताकडे जाणाऱ्या पोर्टल शिरामधील दाब वाढतो.
जसजसा हा दाब अधिक वाढतो तसे किडनीचे कार्य बिघडते आणि पोटात पाणी जमा होऊ लागते.याशिवाय काहीवेळा कॅन्सरमुळेही पोटात पाणी होण्याचा विकार होत असतो. साधारण 10% रुग्णात कॅन्सरमुळे पोटात पाणी जमा झालेले दिसून येते. तसेच हार्ट फेल्युअर आणि किडन्या निकामी झाल्यानेही पोटात पाणी जमा होत असते.पोटात पाणी होण्याची कारणे –लिव्हर सिरोसिस हा यकृताचा आजार पोटात पाणी होणे या विकाराचे प्रमुख कारण आहे. याशिवाय, पोटाजवळील अवयवांतील कर्करोग, यकृत निकामी होणे, हृदय निकामी होणे (हार्ट फेल्युअर), किडन्या निकामी होणे,इन्फेक्शन, स्वादुपिंडाला सूज येणे, यासारखी कारणे पोटात पाणी जमा होण्याला कारणीभूत असतात.
पोटात पाणी होण्याची लक्षणे – (Symptoms of Ascites)पोटात पाणी झाल्याने पोटाचा आकार वाढतो, पोटदुखी, श्वास घेताना त्रास होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, भूक न लागणे, ताप येणे यासारखी लक्षणे पोटात पाणी जमा झाल्याने जाणवू शकतात.त्रासाचे निदान – Ascites Diagnosis test :ओटीपोटाची तपासणी करून आपले डॉक्टर पोटात पाणी होणे या आजाराचे निदान करतत. याशिवाय अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, रक्त चाचण्या, लेप्रोस्कोपी अश चाचण्या कराव्या लागू शकतात.पोटात पाणी होण्याचा विकार होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –
अल्कोहोल, स्मोकींग यासारखी व्यसने करणे टाळा.आहारातील चरबीचे पदार्थ खाणे कमी करा. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांचा समावेश अधिक करा. नियमित व्यायाम करा.वजन आटोक्यात ठेवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर वेदनाशामक गोळ्या खाणे टाळा. हिपॅटायटीस ह्या यकृताच्या आजारापासून पासून बचाव करण्यासाठी हिपॅटायटीस बी लसीबद्दल तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी योग्य ती काळजी घ्या.अशी काळजी घेतल्यास काही प्रमाणात या त्रासापासून दूर राहण्यास मदत होईल.
सौ. शारदा राम यम्मेवार
ईन्टरनॅशल योग शिक्षिका
उमरी जिल्हा नांदेड
Share your comments