त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात.पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती.प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले.कॅन्सर, डायबेटीस. बी.पी. गायब होणार आणि एकदम तंदुरुस्त होणार. कैक टन गव्हांकुर संपले. मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !अल्कली WATER. ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती. म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार.२० हजार - ३० हजार मशीनची किंमत. मशीन्स धूळ खात पडली. लाट ओसरली!सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी.
वजन घटणार ,बांधा सुडौल होणार, हजारो लिटर मध संपले.हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले. लाट ओसरली, मग आली नोनी फळाची लाटनोनीने नानी आठवली पण तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली अलोव्हेरा ज्यूस. सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार. हजारो बाटल्या खपल्या. विशेष काही बदलले नाही! लाट ओसरली!मग रामदेव बाबांची बिस्किटे आली.५०००करोड चा व्यवसाय झाला.परिस्थिती आहे तीच.ही लाट आता उसळ्या घेतेय. ओसरेल लवकरच !लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय
डोकं वापरा आणि Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा आणखी थोडं डोकं लावा आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र.रोजचे शाकाहारी जेवण पालेभाजी,वेलवर्गीय भाजी,फळभाजी,मोडआलेली कडधान्य,सँलड,साजुक तूप,बदलते गोडेतेल,गहूँ,ज्वारी,बाजरी,व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम पहा काय फरक पडतो लोकांना शिस्त नकोय, जीभ चटावलीय, पैसा बोलतोय."स्वयंपाक नकोय, आता तर घरपोच., पंधरा मिनीटातआली लाट मारा उड्या, सतत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!सकाळी लवकर उठणं,रात्री लवकर झोपणं, दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.
Share your comments