अनेकांची सकाळी सकाळी एका चहाच्या घोटाने होते. तर काहीजण गरम चहासोबत बिस्कीट किंवा ब्रेड खाणं पसंत करतात. त्याचप्रमाणे पोहे, समोसे, ऑमलेट, फ्रूट ज्यूस असे देखील पदार्थ सकाळच्या नाश्तात पहायला मिळतात. मात्र तुम्हाला माहितीये का? असे काही पदार्थ आहेत जे रिकामी पोटी खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, काही पदार्थ उपाशी पोटी खाल्ल्याने आतड्यांचं नुकसान होतं. मुख्य म्हणजे आपलं पाचनतंत्र दीर्घकाळ झोपेनंतर त्याचं काम सुरु करतं. त्यामुळे त्याला काहीं वेळ गरजेचं आहे. यासाठी झोपून उठल्यानंतर किमान 2 तासांनी ब्रेकफास्ट करावा.
मसालेदार पदार्थ-उपाशी पोटी मसालेदार पदार्थांचं सेवन केल्यास एसिडिक रिएक्शन होऊ शकते. शिवाय यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच सकाळी नाश्त्याच्या वेळी समोसा, कचोरी, पकोडे खाऊ नयेत.कॉफी - अनेकांची सकाळची सुरुवात कॉफी घेतल्याशिवाय होतच नाही. मात्र उपाशी पोटी कॉफी, चहा पिऊ नये. यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते.दही-दह्यामध्ये लॅक्टिक असिड असतं. जे शरीरातील आम्लता पातळी बिघडवतं.
मसालेदार पदार्थ-उपाशी पोटी मसालेदार पदार्थांचं सेवन केल्यास एसिडिक रिएक्शन होऊ शकते. शिवाय यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच सकाळी नाश्त्याच्या वेळी समोसा, कचोरी, पकोडे खाऊ नयेत.कॉफी - अनेकांची सकाळची सुरुवात कॉफी घेतल्याशिवाय होतच नाही. मात्र उपाशी पोटी कॉफी, चहा पिऊ नये. यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते.दही-दह्यामध्ये लॅक्टिक असिड असतं. जे शरीरातील आम्लता पातळी बिघडवतं. शिवाय पोट रिकमी असल्यावर लॅक्टिक एसिड बॅक्टेरियाला मारून टाकतं, ज्यामुळे एसिडीटी वाढण्यास मदत होते.
लिंबूवर्गीय फळं - फळं आरोग्यासाठी चांगली असतात आणि अनेकजण सकाळच्या नाश्त्याला फळं खाणं पसंत करतात. मात्र तज्ञांच्या म्हणण्यानुसार, उपाशी पोटी आंबट फळं खाऊ नयेत. यामुळे शरीरात ॲसिडचं प्रमाण वाढून त्रास होऊ शकतो.आयुर्वेदाच्या नियमानुसार सकाळी उठल्या उठल्या तहान जरी नसली तरी एक ते दोन ग्लास पाणी प्यायला हवं तेही तोंडसुद्धा न धुता ज्यायोगे सकाळची क्षारीय लाळ पाण्यासोबत पोटात जाऊन पोटातील ॲसिडीक वातावरण सामान्य (न्युट्रल) व्हायला मदत होईल.
संकलन- निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९
Share your comments