आपण आपल्या आहारात नेहमीच गरम-गरम पदार्थ खाणे पसंत करतो. कुठल्याही हॉटेल, उपहारगृहात गेल्यानंतर एखाद्या भाजी सोबत मोठ्या चवीने तंदुरी अथवा चपातीवर ताव देत असतो. आपल्यापैकी असे क्वचितच लोक असतील ज्यांनी शिळी चपाती खाल्ली असेल.
अनेक जण तर एक दोन तास पूर्वीची थंडी चपाती देखील खाणे पसंत करत नाहीत. पण मित्रांनो शिळी चपाती खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळत असतात. वाचून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. जर आपण शिळी चपाती खाल्ली तर यामुळे आपण अनेक रोगांना दूर ठेवू शकता. कारण ती शिळी चपातीत अनेक पौष्टिक गुणधर्म आढळत असल्याचा दावा केला जातो. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया शेळी चपाती खाण्याने आपल्या आरोग्याला मिळणारे काही अद्भुत फायदे.
शिळी चपाती खाण्याचे काही आश्चर्यकारक फायदे
साखर नियंत्रित करण्यास विशेष कारगर
डायबिटीज असलेल्या रुग्णांनी शिळी चपाती खूपच फायदेशीर ठरू शकते. कारण की, शिळी चपाती खाल्ल्याने साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. म्हणून डायबिटीज असलेल्या रुग्णांनी रात्रीच्या जेवणातील उरलेली शिळी चपाती सकाळच्या नाश्त्यात दुधात बुडवून खाण्याचा सल्ला दिला जातो.
पोटासंबंधित अनेक विकार होतात दूर
शिळ्या चपातीचे सेवन पोटासाठीही खूप फायदेशीर ठरत असल्याचा दावा केला जातो. जर एखाद्या व्यक्तीला पोटाशी संबंधित समस्या जसे की अॅसिडीटी, बद्धकोष्ठता असेल तर अशा व्यक्तींनी सकाळी थंड दुधासोबत शिळी चपाती खावी असा सल्ला दिला जातो.
ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण
जर एखाद्याला रक्तदाबाची अर्थात ब्लड प्रेशरची समस्या असेल तर अशा व्यक्तींनी शिळ्या चपात्या खाव्यात. कारण की रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास शिळ्या चपाती मध्ये असणारे पौष्टिक घटक मदत करत असतात. यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये शिळ्या चपात्या थंड दुधासोबत खाव्यात.
शिळ्या चपात्या खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला आणि फायदे मिळत असतात मात्र असे असले तरी शेळी चपाती खाताना काही काळजी देखील घ्यावी लागते. रात्री बनवलेली चपाती सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकतो. पण जर तुम्ही रात्री बनवलेल्या चपात्याचे सेवन दुपारी किंवा 10-15 तासांनंतर केले तर उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. जर चपाती 10-15 तासांपेक्षा जास्त काळापूर्वी बनवली गेली असेल आणि तुम्ही ती खाल्ली तर उलट्या आणि जुलाब होऊ शकतात यामुळे विषबाधा देखील होऊ शकते. म्हणून रात्रीची शिळी चपाती फक्त सकाळीच खावी.
संबंधित बातम्या:-
आरोग्यतज्ञांचा लाख मोलाचा सल्ला! उन्हाळ्यात 'या' चुका करू नका नाहीतर आजारी पडाल
Share your comments