1. आरोग्य सल्ला

तुम्हीही रात्री उशिरा पर्यंत जागता का? मग, सावधान! यामुळे आपल्या आरोग्यावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

सध्या संपूर्ण जगात सोशल मीडियाचे क्रेझ वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक लोकांचा मोबाईलचा स्क्रिन टाइमिंग देखील वाढला आहे. काही सोशल मीडिया चे चाहते रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया हाताळत असतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे तसेच रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आज आपण याच महत्वपूर्ण माहिती विषयी जाणून घेणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम

रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम

सध्या संपूर्ण जगात सोशल मीडियाचे क्रेझ वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक लोकांचा मोबाईलचा स्क्रिन टाइमिंग देखील वाढला आहे. काही सोशल मीडिया चे चाहते रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया हाताळत असतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे तसेच रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आज आपण याच महत्वपूर्ण माहिती विषयी जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, एका संशोधनात असे समोर आले आहे की, रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्यामुळे सर्केडियन रिदम स्लीप डिसऑर्डर हा गंभीर आजार आपल्या आरोग्याला जडू शकतो. यामुळे मानवी आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.

यामुळे निद्रानाश, लवकर झोप न लागणे, झोप उडणे इत्यादी समस्या आपल्याला भेडसावू शकतात. तज्ञांच्या मते, आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आपल्या शरीराला सुमारे सात ते आठ तास झोप अतिआवश्यक आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया रात्री उशिरा झोपणे आणि पुरेशी झोप न झाल्यामुळे आपल्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्यामुळे याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे आपले हृदय कमकुवत बनते. एका संशोधनात असे उघड झाले आहे की, रात्री पाच तासांपेक्षा कमी आणि नऊ तासांपेक्षा जास्त झोप झाल्यास आपल्या आरोग्यावर विशेषता हृदयावर खूपच विपरीत परिणाम होतो.

झोप कमी झाल्यास कोरोनरी हार्ट डिसीज सारखा महाभयंकर रोग जडू शकतो किंवा स्ट्रोक येण्याचा धोका देखील वाढतो. त्यामुळे योग्य वेळी झोपणे आणि योग्य वेळी उठणे सदृढ आरोग्याची गुरुकिल्ली असते. जर आपण देखील रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर ही सवय आजच मोडा आणि रात्री वेळेत झोपत चला यामुळे आपली प्रकृती नक्कीच चांगली सदृढ राहील.

पुरेशी झोप न झाल्यास होतात 'हे' गंभीर परिणाम

  • रात्री पुरेशी झोप न झाल्यास याचा परिणाम म्हणून आपणास मानसिक त्रासातून सामोरे जावे लागू शकते. एवढेच नाही तर यामुळे मेंदूच्या कार्यावर देखील विपरीत परिणाम होतो आणि मेंदूचे आरोग्य खालवले जाऊ शकते.
  • पुरेशी झोप न घेतल्याने आपले लैंगिक आरोग्य धोक्यात येते. यामुळे सेक्स ड्राईव्ह कमी होतो.
  • रात्री पुरेशी झोप न झाल्यास थकवा जाणवतो तसेच दुसऱ्या दिवशी उत्साह कायम राहत नाही.

Disclaimer : सदर लेखात सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं Krishi Jagran Marathi कुठलंही समर्थन करत नाही. या माहितीला केवळ एक सर्वसाधारण सल्ला म्हणून घ्या. अशा पध्दतीचा कोणताही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य राहणार आहे.

English Summary: Do you stay up late Then, beware! This can have serious consequences for your health Published on: 26 March 2022, 09:31 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters