गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह देशात कोरोनाने चिंता वाढवली आहे. यामुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. असे असताना पुण्यातील बायरामजी जीजीभॉय मेडिकल कॉलेज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि पुण्याची स्वतःची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांनी 2, 944 कोरोना रुग्णांच्या जीनोम क्रमाचा अभ्यास केला.
तसेच देशातील तीन प्रमुख संस्थांनी कोरोनाच्या नवीन प्रकारावर वैद्यकीय अभ्यास प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये ओमायक्रॉनपासून निर्माण झालेला XBB.1.16 प्रकार अत्यंत गंभीर आहे. यामध्ये याचा परिणाम झालेल्या 92 टक्के रुग्णांनी संसर्ग होण्यापूर्वी कोरोनाविरोधी लसीचा किमान एक डोस घेतला होता अशांवर झाला आहे.
यामुळे चिंता वाढली आहे. या फॉर्मची लागण झालेल्या प्रत्येक चार रुग्णांपैकी एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते आणि 2.5 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. यामुळे ही आकडेवारी मोठी आहे. संशोधक म्हणतात की XBB. 1.16 प्रकार हा सर्वात व्यापक आहे, जो 60 टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये दिसून येतो. यामुळे यावर अभ्यास सुरू आहे.
दूध धंद्यात परवडत नाही बोलणारांसाठी ही बातमी! पठ्ठ्याने चार एकर जमीन घेतलीय..
यामध्ये असे आढळून आले आहे की हा प्रकार सौम्य नाही आणि त्याचा प्रभाव ओमिक्रॉनच्या इतर प्रकारासारखा गंभीर आहे. यामुळे यावर अजून अभ्यासक काम करत आहेत. येणाऱ्या काळात हा धोका किती वाढणार हे लवकरच समजेल.
गुलाब शेती ठरली फायद्याची! केवळ 10 गुंठ्यांत लाखोंची कमाई..
असे असले तरी अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. यामुळे येणारे दिवस महत्वाचे असणार आहेत.
साखर उत्पादनात महाराष्ट्राला डंका! पटकवला जगात तिसरा क्रमांक..
पुण्यात चार दिवस पावसाची शक्यता, शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत
रोहित पवार यांना धक्का! बारामती ॲग्रोबाबत मोठी बातमी आली समोर...
Share your comments