1. आरोग्य सल्ला

दातांच्या आरोग्याचा इतर शारीरिक आरोग्याशी थेट आहे जवळचा संबंध.

सुंदर दात असणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम असते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
दातांच्या आरोग्याचा इतर शारीरिक आरोग्याशी थेट आहे जवळचा संबंध.

दातांच्या आरोग्याचा इतर शारीरिक आरोग्याशी थेट आहे जवळचा संबंध.

सुंदर दात असणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम असते.

 चांगल्या दातांची लक्षणे - चांगले दात सारख्या आकाराचे व ३२ असतात. ते फटी नसलेले घट्ट चिकटलेले असतात. सुदृढ दात हे शुभ्रवर्णी चमकदार किंचित् पिवळसर झाक असलेले असतात. उत्तम दातांमध्ये स्निग्धता असते. बोटाने या अशा दातांना स्पर्श केला असता ते खरखरीत लागत नाहीत. नुसते पांढरे दात हे सुदृढ दातांचे लक्षण नाही बरं का! तर ते चमकदार हवेत. रक्त दातांपर्यत पोहोचले पाहिजे. दातावर किटण नसावे. हिरड्या लालसर असाव्यात. दातांना फटी असू नयेत व वरचे दात फार पुढे नसावेत दातांची मूळे घट्ट रोवलेली असतील तर हिरड्या स्निग्ध असतात.  

हिरड्याच्या व दातांच्या रोगामुळे सर्वसामान्यपणे इतर शारीरिक आजार उद्भवू शकतात.

हे ही वाचा - जनरिक औषधाबद्दलचा जाणून घ्या हा गोंधळ

                वृद्ध लोकांत अन्न चावायला त्रास होत असल्याने स्निग्ध व मऊ पदार्थांचे (फॅट, कार्बोहायड्रेट इ.) आवश्यकतेपेक्षा अतिसेवन केले जाते व प्रथिने (प्रोटीन्स) त्या मानाने कमी जातात. त्याचा परिणाम म्हणून हृद्रोग व मधुमेह यासारख्या आजारांना आमंत्रण दिले जाते व त्याप्रमाणे कमी शारीरिक हालचाल असल्याने मेदोवृद्धी होऊन लठ्ठपणा येतो. तेव्हा वृद्धांमध्येदेखील वेळीच दंतोपचार करून घेतले, तर निर्माण होणारी मौखिक व शारीरिक दुखणी टाळता येतात.

रक्तवाहिन्यांचे काठिण्य (अथेरोस्क्लेरॉसिस), रक्तात गुठळ्या होणे (थ्रोम्बेएम्ब्लिक डिसीज), हृदयाच्या झडपेचे विकार (व्हाल्व्ह्युलर हार्ट डिसीज), हृदयाची स्पंदनक्रिया व लय बिघडणे (एव्हीदमिआ), हृदयक्रिया बंद पडणे (सीसीएफ), हृदयाच्या आवरणाचा दाह (एन्डोकार्डायटिस) इ. हृदयरोग होऊ शकतात.

दात खराब असलेल्या वा नसलेल्या व्यक्तीस अन्न नीट चावून खाता न आल्याने त्यांचा आहार कमी होतो. 

त्यामुळे जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होतो. त्याचप्रमाणे वयोपरत्वे हाडे ठिसूळ व पोकळ (ऑस्टिओपोरोसिस) होण्याचे प्रमाण वाढते. त्याचा परिणाम शरीरातील इतर हाडांप्रमाणे तोंडातील हिरड्यांवर होऊन त्या लवकर झिजू लागतात. अशा रीतीने दातांचा आधारच कोसळू लागल्याने दात सैल होऊन पडायला-हलायला सुरुवात होते.   

 दातांच्या सर्व समस्या वर नॅचरोपॅथीने खात्रीशीर उपचार

कॉल करण्याअगोदर व्हाट्स अँप करा संपर्क

 

Nutritionist & Dietician

 Naturopathist

 Amit Bhorkar  

 whats app:9673797495

English Summary: Teeth health and other bodies health this is relation is closely Published on: 28 April 2022, 08:09 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters