1. आरोग्य सल्ला

शेळ्यांच्या मावा रोगाची लक्षणे आणि उपचार

शेळ्यांमध्ये दिसून येणारा मावा हा एक विषाणुमुळे होणारा आजार असून तो संसार्गिक आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेळ्यांच्या मावा रोगाची लक्षणे आणि उपचार

शेळ्यांच्या मावा रोगाची लक्षणे आणि उपचार

या आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले, तरी त्या अशक्त होतात.शेळ्यांच्या मावा रोगावर उपचार कोणते?शेळ्यांमध्ये (goat) दिसून येणारा मावा (mawa) हा एक विषाणुमुळे होणारा आजार असून तो संसार्गिक (infectious) आहे. या आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले, तरी त्या अशक्त होतात, उत्पादनक्षमता (productivity) कमी होते. उपचारावर अधिक खर्च होतो. मावा हा शेळ्या-मेंढ्याच्या त्वचेचा आजार आहे. हा आजार सर्व वयोगटातील शेळ्या-मेंढ्यांना होऊ शकतो. करडांना (kids) आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असते.आजाराची लक्षणे- या आजारामध्ये ओठ, नाकपुडीच्या बाजूला किंवा तोंडामध्ये सुरुवातीला पुरळ येतात.- बाधित शेळी-मेंढीपासून निरोगी जनावरांना याचा संसर्ग होतो.

- बाधित शेळ्या, मेंढ्यांना ओठ व हिरड्यांना झालेल्या जखमांमुळे खाद्य खाता येत नाही. परिणामी त्या कमजोर व अशक्त होतात.- मरतूकीचे प्रमाण शेळ्या-मेंढ्यावर असणारा ताण आणि त्यांची प्रतिकारशक्ती यांवर अवलंबून असते.- करडांना आजाराची बाधा झाल्यास सुरवातीला हिरड्यांवर पुरळ येतात. नंतर पुरळ फुटून हिरड्या लालसर होतात. त्याठिकाणी गाठीसुद्धा येऊ शकतात. तोंडातील व तोंडावरील पुरळामुळे पिल्लांना शेळीच्या कासेतील दूध पिणे अवघड जाते.- करडांना आजाराची बाधा झाल्यास, दूध पिताना शेळीच्या सडाला संसर्ग होऊ शकतो. शेळीच्या सडाला पुरळ येऊ शकतात. सडाला बाहेरून रोगाची बाधा झाल्यास शेळ्या करडांना दूध पिऊ देत नाहीत.आजाराची कारणे- शेळ्या-मेंढ्यावर इतर कोणताही ताण असल्यास किंवा त्यांना कोणत्या आजाराची बाधा झालेली असल्यास.

- त्यांना पुरेसे खाद्य न मिळाल्यास, निकृष्ट दर्जाचा चारा खाण्यास दिल्यास.- चरायला सोडल्यानंतर चरताना लागलेले काटे किंवा इतर कारणामुळे झालेल्या जखमांमधून विषाणूंचा संसर्ग होतो.- हा आजार प्राण्यांमधून मानवाला होणारा आजार आहे. सडाला प्रादुर्भाव झालेल्या शेळ्यांचे दूध काढल्यास याच प्रकारचा संसर्ग दूध काढणाऱ्याच्या हाताला व बोटांना देखील होऊ शकतो.नुकसान-या आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी, शेळ्या-मेंढ्या अशक्त होऊन जातात.- औषधोपचावर जास्त खर्च होतो.- शेळ्या-मेंढ्याची उत्पादनक्षमता कमी होते.- पिल्लांच्या वाढीवर परिणाम झालेला दिसून येतो. त्यांना बाजारात योग्य किंमत मिळत नाही.- काही शेळ्या-मेंढ्यांमध्ये कायमस्वरूपी वंधत्व येते.

उपचार- हा आजार विषाणुजन्य असल्यामुळे कोणत्याही प्रतिजैविकाचा वापर प्रभावी होत नाही.- या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नाही.- जखमा सकाळी आणि संध्याकाळी पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या पाण्याने धुवून साफ करून घ्याव्यात.- तोंड व ओठांवरील जखमांवर बोरोग्लिसरीन, हळद, लोणी किंवा दुधाची साय यासारखे पदार्थ लावावेत.- शेळ्या-मेंढ्यांचा अशक्तपणा दूर करण्यासाठी लापशी, गूळ यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा.

 

शेतकरी हितार्थ

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

English Summary: Symptoms and treatment of goat blight Published on: 04 May 2022, 05:32 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters