1. आरोग्य सल्ला

Stress म्हणजे तणाव दूर करून रोजच्या जगण्यात उत्साह कसा आणावा? पहा

तणावात राहिल्याने होणारे दुष्परिणाम म्हणजे त्याने तुमची प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे कार्यक्षमता कमी होते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
Stress म्हणजे तणाव दूर करून रोजच्या जगण्यात उत्साह कसा आणावा? पहा

Stress म्हणजे तणाव दूर करून रोजच्या जगण्यात उत्साह कसा आणावा? पहा

तणावात राहिल्याने होणारे दुष्परिणाम म्हणजे त्याने तुमची प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे कार्यक्षमता कमी होते. आणि परफॉर्मन्सवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.आपल्याला तणाव कुठल्या गोष्टींचा येतो?तणाव हा आपल्या एखाद्या वैयक्तिक कारणावरून असू शकतो, ऑफिस किंवा व्यावसायिक कारणामुळे असू शकतो किंवा अगदी एखादी डिस्टर्ब करणारी बातमी मिळाल्याने सुद्धा असू शकतो.कारण काही का असेना पण एवढं नक्की कि तणाव हि आपल्या मनाचीच एक अवस्था असते आणि केवळ आपणच त्याच्याशी मुकाबला करू शकतो.

तुम्ही जर तुमच्या तणावावर कंट्रोल नाही ठेवला तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो किंवा तणावाचं कारण जर व्यक्तिगत आयुष्याशी निगडित असेल तर त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधांवर सुद्धा होऊ शकतो.तणावाला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करता?टीव्ही बघता? पिक्चर बघता? मोबाईलवर गेम खेळता? किंवा अगदी बिछान्यावर आडवे पडून घेता….पण त्याने होतं असं कि हे झाल्यांनतर यातून मोकळे झाल्यावर पुन्हा तेच विचार घोंगावायला लागतात. आणि वेळ हि वाया गेल्याने तणाव आणखी वाढू शकतो. हे असं कुठे तरी स्वतःला गुंतवून घेणं हा तात्पुरता उपाय ठरतो.

तर आता आपण तणाव दूर करण्यासाठी काही नामी उपाय बघुजर तुम्ही कामाच्या व्यापामुळे तणावात असाल तर आपल्या दिवसभराच्या कामाचे व्यवस्थापन नीट करा. एक टू डू लिस्ट बनवा. आणि त्यानुसार सगळी कामे पूर्ण करा. याने आपल्या आवश्यक त्या कामांवर तुमचे लक्ष पण राहील. आणि एक एक काम पूर्ण झाल्याचा आनंद मिळून कामांचा योग्य तो निपटारा झाल्याने सकारात्मकता पण येईल.ताण तणावामुळे बरेचदा आत्मविश्वास डळमळीत होतो. जगण्यात रस वाटत नाही. काही करण्याची इच्छा सुद्धा राहत नाही. 

अशा वेळी बाहेर जा आणि एका अश्या सुहृदाला, मित्र, मैत्रिणीला भेटा जो तुमचा आदर करतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो एवढंच नाही तर योग्य त्या वेळी तुमची प्रशंसा सुद्धा करतो. याने तुम्ही मोटिव्हेट व्हाल. आणि स्वतःला त्या दृष्टिकोनातून बघितले तर तुमच्या आतमधला आत्मविश्वास पण वाढण्यास मदत होईल.तणावाला घालवण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे सगळे काम बाजूला ठेऊन फुरसतीच्या वेळात करण्यासारख्या काही ऍक्टिव्हिटीज करा छंद जोपासा. पण या ऍक्टिव्हिटीज अशा असाव्यात ज्यात तुमचा सक्रिय सहभाग असेल. म्हणजे टीव्ही बघणे, मोबाईल स्क्रोल करणे हे न करता अगदी डान्स, चत्रकला असे आपल्या आवडीचे छंद जोपासा आणि त्यात काही वेळ मन रमवून ताजे तवाने होऊन कामाला लागा.

 

संकलन- निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९

English Summary: Stress is how to get rid of stress and bring excitement in daily life? See Published on: 30 June 2022, 12:24 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters