कारले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु एक कारल्याच्या कडूपणामुळे ते आपल्यातील बऱ्याच जणांना खायला देखील आवडत नाही. परंतु जर आपण कारल्याचा विचार केला तर ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप समृद्ध आहे.
जर तुम्ही कारले खात असाल तर तुमच्या शरीरातील इन्सुलिनची पातळी देखील नियंत्रणात राहते. एवढेच नाही तर पोटासंबंधीच्या तसेच यकृत आणि अस्थमाचा रुग्णांसाठी देखील कारले खूप फायदेशीर आहे. या लेखामध्ये आपण कारल्याचा रस व त्याचे आरोग्यदायी फायदे याबद्दल माहिती घेणार आहोत.
कारल्याच्या पाणी म्हणजे रस पिण्याचे आरोग्याला होणारे फायदे
1- पोटाच्या आरोग्यासाठी- कारण यामध्ये असलेल्या फॉस्फरसचा प्रमाणामुळे बद्धकोष्ठतेचा समस्या दूर होते व पोटातील पाचक एंजाइमचे उत्पादन सुधारते व पचनास देखील मदत होते. त्यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न लवकर पचते.
2- लिव्हरसाठी फायदेशीर- कारल्याचा रस हा लिव्हर साठी खूप फायदेशीर असून त्यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट लिवर मधील एंजाइम सुधारतात व त्यांचे कार्य गतिमान करतात.
3- त्वचेसाठी लाभदायक- कारल्याचे पाणी म्हणजे रस पिण्यामुळे त्यात असलेल्या अँटी बॅक्टरियल गुणधर्मांमुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम दूर होतात व त्वचेचा संसर्ग असतात त्यावर देखील फायदेशीर आहे.
4- रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी- कारल्याचे पाणी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील उपयुक्त असून त्यामध्ये असलेल्या अँटी व्हायरल गुणधर्मामुळे शरीराला अनेक व्हायरल इन्फेक्शन पासून वाचण्याचे काम करते.
एवढेच नाही तर त्यामध्ये असलेले अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
5- रक्तातील शुगर संतुलित राखते- कारल्याचा रस यामुळे रक्तातील साखर संतुलित राहण्यास मदत होते कारल्या मध्ये असलेले अँटिऑक्सिडंट स्वादुपिंडाच्या कार्याला देखील गती देतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे पचन होण्यास मदत होते व साखरेचे प्रमाण संतुलित राहते.
नक्की वाचा:Health Tips: पायावरचे 'हे' संकेत असू शकतात लिव्हर डॅमेजची लक्षणे, वाचा महत्वपूर्ण माहिती
Share your comments