आता कडक उन्हाळा सुरू आहे. अक्षरशा अंगाची लाही लाही करणारा हा उन्हाळा कधी संपेल असे प्रत्येकाला झाले आहे.
. जास्त उकाड्या पासून बचाव करण्यासाठी घरामध्ये कुलर, एयर कंडीशनर आणि थंड पाणी पिण्यासाठी रेफ्रिजरेटर यांचा उपयोग केला जातो. घरामध्ये बरेचजण उन्हाळ्यामध्ये जास्तकरून फ्रीजचे पाणी पितात. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की, जेवढे फ्रिजमध्ये थंड पाणी असते जितके थंडपाणी मातीच्या माठामध्ये देखील असते आणि 'जुनं ते सोनं' या उक्तीप्रमाणे माठा मधील पाणी हेफ्रिजमधील पाण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहे. माठातील पाणी हे आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास देखील मदत करते. या लेखामध्ये आपण माठा मधील पाणी पिण्याचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेऊ.
माठा मधील पाणी पिण्याचे फायदे
1- माठातील पाणी पीएच बरोबर ठेवते- माठामध्ये पाणी ठेवल्यामुळेत्या पाण्याचा पीएच चांगला राहतो.कारण मातीतील सगळे गुण त्या पाण्यामध्ये मिसळून जातात ज्यामुळे त्याचा पीएच हा संतुलित राहण्यास मदत होते.हे पाणी प्यायल्याने पित्ताचा आणि पोट दुखीचा त्रास होत नाही.
2- घसा तंदुरुस्त होतो-जर आपण फ्रिजमधील पाणी सातत्याने प्यायलो तर बऱ्याच समस्या निर्माण होतात.या पाण्यामुळे शरीरातील अवयव आणि घसा खूप थंड करतात. त्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होण्याचा धोका संभवतो. घशातील पेशींच्या तापमानामध्ये अचानक घसरण झाल्याने घशाला सूज येणे, खवखवणे तसंच खोकला आल्यासारखे समस्या निर्माण होतात. परंतु माठातील पाणी प्यायल्याने वरील समस्या निर्माण होत नाही.
3- माती विषारी पदार्थ शोषून घेते- मातीमध्ये असे गुणधर्म असतात की ते पाण्यातील विषारी पदार्थ शोषून घेतात आणि पाणी शुद्ध करतात. यामुळे पाण्यातील सर्व आवश्यक सूक्ष्म पोषक घटक पाण्यातच राहतात.
4- शरीराची चयापचय वाढते- जर रोज माठातील पाणी पिले तर शरीराची चयापचय क्रिया वाढण्यास मदत होते. फ्रिजमध्ये आपण प्लास्टिकच्या बॉटल मध्ये पाणी ठेवतो.
त्यामुळे या प्लास्टिक मधील अशुद्धता यामध्ये मिसळली जाते. ज्यामुळे आपल्या शरीरात टॉक्सिनचे प्रमाण वाढते. परंतु माठातील पाणी दररोज पिले तर शरीरात टेस्टोस्टेरोन वाढतो.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:केंद्र सरकारने केली खतांच्या अनुदानावर वाढ, तरीही बाजारपेठेत नफेखोरांचा काळाबाजार
Share your comments