1. आरोग्य सल्ला

कॅन्सरचा गंभीर प्रकार ब्रेन ट्यूमर; काय आहेत याची लक्षणं आणि उपचार? जाणून घ्या.

4 फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिवस साजरा करण्यात येतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कॅन्सरचा गंभीर प्रकार ब्रेन ट्यूमर; काय आहेत याची लक्षणं आणि उपचार? जाणून घ्या.

कॅन्सरचा गंभीर प्रकार ब्रेन ट्यूमर; काय आहेत याची लक्षणं आणि उपचार? जाणून घ्या.

कॅन्सर जीवघेणा आणि गंभीर आजार. भारतात दरवर्षी हजारो लोकांचा या जीवघेण्या आजाराने मृत्यू होतो. कॅन्सर सारख्या आजाराची सर्वच लक्षणं जीवघेणी आणि गंभीर आहेत. परंतु, सर्वात घातक कॅन्सरच्या प्रकारांपैकी एक म्हणजे, ब्रेन ट्यूमर. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 2 टक्के ब्रेन ट्यूमरचे रूग्ण आहेत. जाणून घेऊयात याबद्दल.कसा होतो ब्रेन ट्यूमर?ब्रेन ट्यूमरबाबत असं दिसून आलं आहे की, अनेकदा हा ट्यूमर वाढणाऱ्या वयानुसार वाढत जातो. विशेषतः लहान मुलांमध्ये या आजाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते.ब्रेन ट्यूमरचा धोका अनुवांशिक असतो. 

जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हा आजार झाला असेल तर इतरांनाही हा आजार होण्याचा धोका असतो.ब्रेन ट्यूमर होण्याच्या इतर कारणांमध्ये मोबाइल फोन रेडिएशन, हार्मोनल फॅक्टर, कम फ्रीक्वेंसी असलेलं चुंबकीय क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना याचा अधिक धोका असतो.ब्रेन ट्यूमरची लक्षणं :ब्रेन ट्यूमरच्या अधिकाधिक रूग्णांना डोकेदुखीच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. तसेच उलटी होणं, मळमळणं यांसारख्या समस्याही उद्भवतात.ब्रेन ट्यूमरच्या रूग्णांना शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणं हे सामान्य लक्षण आहे. याव्यतिरिक्त पाहण्यासाठी आणि बोलण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

ब्रेन ट्यूमरवर उपचार काय?ब्रेन ट्यूमरवर उपचार न्यूरोसर्जरी, रेडिएशन आणि औषधांमार्फत करण्यात येतात.आजाराच्या लक्षणांच्या आधारावरच उपचार करण्याची पद्धत निवडण्यात येते. सुरुवातीला कीमोथेरपीमार्फत उपचार करण्यात येतात. तर त्यानंतरच्या स्टेजमध्ये ऑपरेशन आणि रेडियोथेरपीची पद्धत वापरण्यात येते. कॅन्सर जीवघेणा आणि गंभीर आजार. भारतात दरवर्षी हजारो लोकांचा या जीवघेण्या आजाराने मृत्यू होतो. कॅन्सर सारख्या आजाराची सर्वच लक्षणं जीवघेणी आणि गंभीर आहेत. परंतु, सर्वात घातक कॅन्सरच्या प्रकारांपैकी एक म्हणजे, ब्रेन ट्यूमर. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 2 टक्के ब्रेन ट्यूमरचे रूग्ण आहेत. जाणून घेऊयात याबद्दल.

ब्रेन ट्यूमरवर उपचार काय?ब्रन ट्यूमरवर उपचार न्यूरोसर्जरी, रेडिएशन आणि औषधांमार्फत करण्यात येतात. आजाराच्या लक्षणांच्या आधारावरच उपचार करण्याची पद्धत निवडण्यात येते. सुरुवातीला कीमोथेरपीमार्फत उपचार करण्यात येतात. तर त्यानंतरच्या स्टेजमध्ये ऑपरेशन आणि रेडियोथेरपीची पद्धत वापरण्यात येते.दरम्यान, या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपण जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे. शरीरात होणारे बदल आणि लक्षणं लक्षात घेतली तर उपचारांच्या मदतीने या आजारापासून पूर्णपणे बरं होणं शक्य आहे.

English Summary: Severe forms of cancer are brain tumors; What are the symptoms and treatment? Find out. Published on: 24 May 2022, 07:54 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters