1. आरोग्य सल्ला

तुमचं हृदय किती वर्षाचं आणि किती निरोगी आहे पहा

खालील बातमी वाचून मन एकदम सुन्न झालं,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
तुमचं हृदय किती वर्षाचं आणि किती निरोगी आहे पहा

तुमचं हृदय किती वर्षाचं आणि किती निरोगी आहे पहा

खालील बातमी वाचून मन एकदम सुन्न झालं, बातम्या मध्ये प्रकाशित झालेली खरी घटना आहे, दुर्लक्षित किंवा वाचून सोडून देऊ नका, विचार करा. उद्या वेळ आपल्या वर किंवा घरातील व्यक्ती वर ही येऊ शकते, योग्य ती काळजी आज पासून नाही तर आत्ता पासूनच घ्या..आतापर्यंत तुम्ही वयस्कर लोकांना हार्ट अटॅक आल्याचे ऐकलं असेल पण एक अजब प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबात डॉक्टरांनाही धक्क बसला आहे. अवघ्या 9 वर्षांच्या मुलीला ह्रदयविकाराचा झटका येऊन कोसळली आहे. ती खेळत असताना खाली पडल्यानंतर तिच्या

आई वडिलांनी रुग्णालयात नेल्यावर हा सगळा प्रकार समोर आला आहे.All this came to light when the parents took him to the hospital. मिड डेने दिलेल्या माहितीनुसार, अवनीला वयाच्या 9 व्या वर्षी अचानक हर्ट अटॅक आला. दरम्यान तिला तातडीने मुंबईच्या एका मोठ्या रुग्णलयात हलवण्यात आलं तिच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली. अवनीच्या वडिलांनी याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले कि, अवनी नेहमीप्रमाणे खेळत होती. खेळता खेळता अचानक तिच्या छातीत दुखू लागलं. छातीत जोरात कळ आली म्हणून आम्ही अवनीला सोबत घेऊन आणि दवाखाना गाठला.

डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या. या टेस्टमध्ये अवनीची कोलेस्ट्रॉल लेव्हल तपासण्यात आली यामध्ये तिची टेस्ट अत्यंत हाय दाखवली. वयाच्या 65व्या वर्षी एखाद्या व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल जी असते, तशी अवनीची होती. तिचं हृदय वयोवृद्ध माणसाइतकं कमकुवत झालं होतं. डॉक्टरदेखील ही बाब पाहून चक्रावून गेले होते. यानंतर वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांमधून निदान होतं गेलं. आणि अखेर अवनीला नेमकं काय झालंय, ही बाब समोर आल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. अवनीवर उपचार केलेले डॉक्टर शिवप्रकाश कृष्णनाईक म्हणाले कि, अवनीला

हायपकोलेस्ट्रोलमिआ आहे. यामुळे अवनीची कोलेस्ट्रोल पातळी वाढते आणि त्यामुळे तिला हार्टअटॅकचा मोठा धोका संभवतो. छातीमधील दुखण्याचं नेमकं कारणंही हेच होतं, असे डॉक्टर कृष्णनाईक म्हणाले. जिथे नॉर्मल कोलेस्ट्रॉल लेव्हल 150 ते 200 mg/dl इतकं असायला हवं, तेच अवनीच्या बाबती 600 पेक्षा जास्त असल्याचे डॉक्टर कृष्णनाईक म्हणाले. मी माझ्या 30 वर्षांच्या करीअर

पहिल्यांच अशी केस हाताळतोय. अवनीला झालेला हा आजार जेनेटीक असण्याची जास्त शक्यता असल्याचंही ते म्हणाले. पण लहान मुलांमध्ये एका वृद्ध व्यक्तीसारखं हृदय आढळून आल्याचं मी याआधी कधीच पाहिलं नसल्याचे त्यांनी सांगितले.अवनीवर बायपास सर्जरी झाली. सर्जरी यशस्वी झाली. आता अवनीच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. ती पुन्हा नेहमीसारखं हसू, खेळू

आणि बागडू शकतेय. पण आता तिला आयुष्यभर औषधांचा आधार घ्यावा लागणार आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवावं लागणार आहे. ही घटना समोर आल्यानंतर डॉक्टरांनीही छातीमधील दुखण्याकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरु शकतं,असं म्हटलंय. अन्यथा हार्टअटॅक येऊन मृत्यू होण्याचा धोका असतो, असं जाणकार सांगतात.त्यामुळे वेळीच वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेणं नितांत गरजेचं आहे.

 

Nutritionist & Dietitian

Naturopathist

Dr. Amit Bhorkar

whats app: 7218332218

English Summary: See how old and healthy your heart is Published on: 20 August 2022, 04:54 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters