1. आरोग्य सल्ला

उटणे लावल्यामुळे शरीराला होणारे फायदे वाचाच!

वसुबारसपासून या दिवाळीची सुरुवात होते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
उटणे लावल्यामुळे शरीराला होणारे फायदे वाचाच!

उटणे लावल्यामुळे शरीराला होणारे फायदे वाचाच!

वसुबारसपासून या दिवाळीची सुरुवात होते. दिव्यांची आरास, दारासमोर सडा-रांगोळी नवीन कपडे आणि फराळ करण्याची पद्धत आहे. यावेळी मान्सून संपलेला आणि शेतातलं पीक कापून घरात येत असतं. त्यामुळे धन-धान्य आणि लक्ष्मीचं पूजा केली जाते.टणे लावल्यामुळे शरीराला होणारे फायदे काय आहेत पाहूया.1) स्वच्छ त्वचा करण्यासाठी.उटण्यामधील आयुर्वेदीक घटकांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. परिणामी अ‍ॅक्ने, पिगमेंटेशन,

स्कार्स कमी होण्यास मदत होते. यामुळे सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते.This helps prevent skin damage caused by sun exposure. लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने

कोणत्याही केमिकलचा वापर न करता पांढरे केस करा काळे, ते ही घरच्या घरीच

https://marathi.krishijagran.com/health/make-white-hair-black-at-home-without-using-any-chemicals/

त्याचे काही थेंब मिसळणे फायदेशीर ठरते.2) आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी होण्यास मदत होते. मात्र त्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात जाणे टाळा. जायचे झाल्यास सनस्क्रीनचा वापर आवर्जून करावा.3) उटणे नैसर्गिकरित्या चमक देते.उटण्यामध्ये रक्तचंदन, वाळा, चंदन, वेखंड, कात, नागरमोथा यासारख्या वनस्पती आणि खोडांचा वापर

केला जातो. हे घटक त्वचेला स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. याशिवाय उटण्याच्याबरोबरीने बेसन पीठही लावल्यास ते फायद्याचे ठरते.4) चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्वचा मुलायम होण्यासाठी दिवाळी हा थंडीच्या दिवसांत येणारा सण. थंडीमुळे शरीराची त्वचा कोरडी होते. अनेकदा अशा कोरड्या त्वचेमुळे आगही होते. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी पूर्वीपासून उटण्याचा वापर केला जातो.5) उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन ती मुलायम होण्यास सुरुवात

होते. उटण्यामध्ये असणारी चंदन पावडर आणि हळद यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. त्यामुळे दिवाळी शिवायही एरवी आणि विशेषतः थंडीच्या दिवसात आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर जरुर करावा. 6) वयानुसार त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या हे अतिशय सामान्य आहे. उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत दिसते. याशिवाय उटण्यात मध किंवा दूध लावल्यास त्याचा जास्त फायदा होतो. मध मिसळल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

 

संकलन- निसर्ग उपचार तज्ञ डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९

English Summary: Read the benefits of using camels for the body! (1) Published on: 25 October 2022, 05:01 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters