मानसिक आरोग्य म्हणजे सोप्या भाषेत समजायचे झाल्यास आपले विचार काय आहेत? भावना कुठच्या निर्माण होतात? व्यायाम ध्यान आणि आरोग्यदायी आहार करता कि नाही, उस्ताह वाटतो कि नाही? तुमचा जसा स्वभाव आहे त्यानुसार तुम्ही वागता कि नाही? तम्ही समजूतदार आहत कि नाही? तुमची तुमच्या भावना व्यक्त करू शकता का? जर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हि हा असतील तर तुम्हाला कुठलीही मानसिक समस्या नाही आहे, तुमचे मानसिक आरोग्य उत्तम आहे. जर वरील
प्रश्नाची उत्तरे नाही असतील तर तुम्हाला मानसिक समस्या आहे If the answer to the question is no, then you have a mental problem व तुम्हाला त्यावर उपचार करावे लागतील.माझ्याकडे उपचाराला आलेल्या व्यक्तीचे उदाहरण देऊन सांगतो.
रिफाईंड ऑइल आपल्याला हानिकारक आहे, मग कुठलं तेल खाण्यात वापरायचे आणि तेच का खायचं?
ती व्यक्ती हि बह्व्निक दृष्ट्या हळवी होती, एकदा तिचा तरून वयात सर्व नातेवैकांसमोर अपमान झाला व तो वयाच्या ५० वर्षापर्यंत तसाच होता, ह्या मानसिक समस्येचे रुपांतर हे मनो शारीरिक आजारात झाले होते, डिप्रेशन फोबिया, एंझायटी मध्ये झाले होते. ह्यामुळे डोके दुखीचा आजार झाला होता व त्यावर समस्या नाही
समजल्यामुळे अर्ध शिशी आजाराचा उपचार सुरु होता.जेव्हा समुपदेशन सेशन सुरु झाले तेव्हा त्याच्या पूर्ण भावना व्यक्त केल्या, त्याच्या मनात काहीही ठेवले नाही. जस जसे सेशन पुढे जावू लागले तसतसे त्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधार दिसू लागला, झोप पूर्ण व्हायला लागली, डोके दुखी एकदमच कमी झाली, पोटाचे आजार बरे झाले व काही दिवसातच ती व्यक्ती पूर्ण बरी झाली.हा मनोशारीरिक आजार का झाला असेल?आता समजा एक व्यक्ती आहे जिची पचनक्षमता उत्तम आहे तिने कितीही खाल्ले तरी कसलेही आजार
होत नाही. सर्वकाही पचून जाते. आता इथे दुसरी व्यक्ती आहे, जिची पचनक्षमता हि कमजोर आहे व जास्त खाल्ले किंवा काहीही खाल्ले कि पोट खराब होते. हे अनुवांशिक किंवा जन्मजात बोलू शकतो ह्यामुळे ह्या जगातील कुठल्याही व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हि वेगवेगळी असते. मग आजारी न पडण्यासाठी कमजोर पचनक्षमता असलेल्या व्यक्तीला योग्य आहार घ्यावा लागतो. असेच काही मानसिकतेचे देखील आहे.
आता महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे मानसिक आरोग्य वर सांगितल्याप्रमाणे सर्व करूनही सुधरत नसेल तर तुम्ही तपासा कि समस्या तुमच्यात आहे कि बाहेर जसे कि व्यक्ती आणि परिस्थिती मध्ये, जर समस्या बाहेर असेल तर त्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा ते देखील कायमस्वरूपी, परिस्थिती मधून बाहेर पडा. सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा, नकारात्मक व्यक्ती घरची असली तरीही तिला आयुष्यातून बाहेर काढा, तुम्ही सवय बदलू शकता आणि स्वभाव नाही.
अश्विनीकुमार
Share your comments