गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला कोरोना आता पुन्हा वाढू लागला आहे, यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट येणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज्यात दररोज ही संख्या वाढतच चालली आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे आता राज्य शासनाकडून परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पुन्हा नियमावली लागू होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
यातच पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांची (Pune) डोकेदुखी वाढली आहे. दोन दिवसात साधारण जिल्ह्यात 225 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी काळजी घेतल्यास कोरोना वाढणार नाही, मात्र अनेकजण मास्क वापरत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे संसर्ग वाढत आहे.
सध्या रुग्णालयात भरती होणाऱ्यांच प्रमाण कमी असल तरीही तालुक्याच्या ठिकाणी कोवीड सेंटर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात हा आकडा वाढत गेला तर मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. असे असले तरी लसीकराणामुळे गंभीर लक्षणांमध्ये कोणतीही वाढ दिसत नाही. बहुतेक नागरिकांना लसीकरण केले गेले आहे. यामुळे मृत्यू कमी होत आहेत.
मोठी बातमी! दारू 40 टक्यांनी स्वस्त, महसूल वाढीसाठी मोठा निर्णय
पुण्यात कमी झालेला कोरोना बाधित दर पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दोन दिवसात जिल्ह्यात 225 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेत. बाधित दर हा 4.6 टक्क्यांवर गेला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
शेतकऱ्यांनो 'ही' जात लय भारी!! गाई देते सर्वात जास्त दूध, वाचा सविस्तर..
सध्या अचानक कोरोना बाधितांची रूग्ण संख्या वाढत असल्याने अलर्ट देण्यात आला आहे. तसेच संशयास्पद असणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे. दोन वर्षापुर्वी कोरोनाने संबंध देशात हाहाकार माजवला होता. यामध्ये पुण्यात परिस्थिती हाताबाहेर गेली होती. यामुळे अनेकांचे मृत्यू झाले होते. यामुळे आता सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
न्यूझीलंड सरकारचा निर्णय, गुरांनी ढेकर दिल्यावर मालकांना भरावा लागणार कर, कारणही आले समोर...
मोफत रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय
शेतकऱ्यांची काळजी मिटली! आता प्रत्येक शुक्रवारी हवामानाच्या अंदाजासह मिळणार कृषी तज्ज्ञांचा सल्ला
Share your comments