सध्या राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे उन्हापासून आणि घामापासून आराम मिळवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कपड्यांपासून ते सकस आहारापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सकस पदार्थांचे सेवन केले पाहिजे. आपण आहारात भरपूर पाणी असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता. ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
शिवाय शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात. तुम्ही तुमच्या आहारात सुपरफूडचा समावेश करू शकता. जसे की, टरबूज, काकडी आणि पुदिना इ. यांसारख्या अनेक पदार्थांचे सेवन तुमच्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करतील. याशिवाय तुम्ही इतर कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता ते आता आपण जाणून घेऊया.
दही
दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते आतडे निरोगी ठेवण्याचे काम करतात. उन्हाळ्यात दह्यापासून बनवलेली लस्सी आणि ताक यांचे सेवन फायद्याचे आहे. इतर अनेक पदार्थ बनवण्यासाठीही दही वापरता येते. दहीचा वापर पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी देखील केला जातो.
ठाकरे सरकारची मोठी घोषणा; आता शेतकऱ्यांना मशागतीसाठी मिळणार मोफत ट्रॅक्टर
पुदीना -
पुदीना चा थंड प्रभाव असतो. उन्हाळ्यात तुम्ही पुदिन्याचे ताक किंवा पुदिन्याची चटणी खाऊ शकता. त्यामुळे उष्णतेपासून आराम मिळण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.
नारळ पाणी -
नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यामुळे पोट थंड राहण्यास मदत होते. नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तुम्ही जर रोज एक ग्लास नारळ पाणी पिले तर तुमचे आरोग्य निरोगी बनेल.
टरबूज -
टरबूजमध्ये ९० टक्के पाणी असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. यामुळे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. तुम्ही टरबूजात काळी मिरी, मीठ आणि चाट मसाला टाकून चाटच्या स्वरूपातही याचे सेवन करू शकता.
अतिरिक्त उसासाठी आता मुख्यमंत्री रिंगणात, घेतला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा
सत्तू-
सत्तूचे सेवन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. सत्तूमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही याचे सेवन सरबत किंवा पराठ्याच्या रूपात करू शकता. सोपी पद्धत म्हणजे एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सत्तू टाका आणि त्यात लिंबाचा रस आणि मीठ घाला. त्याचे सेवन करा.
काकडी -
काकडीत ९० टक्के पाणी असते. त्यामुळे हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास सक्षम असणार फळ आहे. प्रामुख्याने याचा सॅलडच्या स्वरूपात जास्त प्रमाणात वापर केला जातो. उन्हाळ्यात आपल्या आहारात काकडीचा समावेश करणे आवश्यक आहे. हे तुमचे शरीर थंड करते.
महत्वाच्या बातम्या
Earning With Sbi: स्टेट बँक देत आहे तुम्हाला कमाईची 'ही' संधी! त्यामुळे माहिती वाचा आणि करा विचार
आनंदाची बातमी! एक मे नंतर गाळप होणाऱ्या उसाबाबत मोठा निर्णय, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Share your comments