कडु असलेला कडुलिंब आहे अमृतकारी ; करतो पोटाचे विकार दूर

Friday, 03 July 2020 09:10 PM


कडुनिंब एक औषधी वनस्पती आहे, जी अनेक घटकांनी समृद्ध असल्याचे मानले जाते. या झाडाच्या पानांची चव कडू आहे, परंतु त्याचे फायदे अमृतासारखेच आहेत. पोटातून शरीराच्या प्रत्येक भागाच्या समस्येसाठी हा रामबाण उपाय आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून कडुलिंबाच्या अशा आश्चर्यकारक फायद्यांबद्दल परिचय करून देत आहोत, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही.

पोटातील जंत

पोटातील जंत दूर करण्यासाठी कडूनिंबाच्या पानात मध आणि मिरपूड मिसळा. त्याचा दोन – तीनदा वेळा हा प्यायला प्या.

ताप

ऋतू बदलला की आपल्याला सर्दी , खोकला, ताप येत असतो. हे नेहमीचे चक्र झाले आहे. पण जर तुम्ही दररोज कडुनिंबाची दोन पाने खाल्ली तर आपल्याला कधीच ताप येणार नाही.

मुरुम

कडुनिंबाचा पाला वाटून तो मुरुमांवर लावल्यास आराम मिळतो आणि त्वचा रोगमुक्त देखील राहते.

किडनी स्टोन(मुतखडा)

किडनी स्टोनचा त्रास टाळण्यासाठी सुमारे १  ग्रॅम कडूलिंबाची पाने १ लिटर पाण्यात बारीक करून घ्या आणि चांगले उकळवा. नंतर हे पाणी थंड झाल्यावर प्या. दररोज असे केल्यास मुतखड्याच्या समस्येपासून मुक्तता होईल. जर दगड तुमच्या मूत्रपिंडात असेल तर दररोज सुमारे 2 ग्रॅम कडुलिंबाची पाने पाण्याबरोबर घ्या, त्याचा फायदा होईल.

कान दुखणे

कडुनिंबाचे तेल कानात टाकल्यास कान दुखणे किंवा कानाच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

तोंडाच्या समस्या

कडूलिंब दातांसाठीही फायदेशीर आहे, नियमितपणे कडुनिंबाने दात    घासल्याने जंतू नष्ट होतात आणि हिरड्या मजबूत होतात आणि दात चमकदार व निरोगी असतात.

काविळ

काविळ मध्येही कडुनिंबाचा उपयोग खूप फायदेशीर आहे. काविळच्या रुग्णाला कडुलिंबाच्या पानांच्या रसात आल्याच्या पावडरचे मिश्रण द्यावे किंवा कडुनिंबाच्या पानांचा 2 भाग आणि 1 भाग मध मिसळून प्यायल्यास काविळवर गुणकारी ठरते.

Neem neem oil stomach ailments कडुनिंब औषधी वनस्पती Herbs
English Summary: Neem which is bitter but it is nectar; which cures stomach ailments

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.