रस्त्याच्या बाजूला अनेकदा तुम्ही कडुलिंबाचे झाड पहिले असेल. कडुलिंबाची चव कडू जरी असली तरी त्यामध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. कीटकनाशक, रोगनाशक, खते म्हणून वापरण्यात येणाऱ्या कडुलिंबाचे अधिक फायदे आपण जाणून घेऊयात.
कडुलिंबाचे फायदे-
१. शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी कडुलिंब उपयुक्त ठरते.
२. शरीरातील हानिकारक विषयुक्त पदार्थ बाहेर पाडण्यासाठी कडुलिंब मदत करते.
३. शरीरातील जंतू नाश करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जातो.
४. सौंदर्य प्रसाधनात कडुलिंबाचा वापर केला जातो.
५. केस गळती, डँड्रफ यांसारख्या केसाच्या अनेक समस्यांवर कडुलिंब फायदेशीर ठरते.
६. युरीन इन्फेकशन झाल्यास कडुलिंबाची पाने त्यावर उपयुक्त ठरते.
७. विविध प्रकारच्या त्वचा रोगावर कडुलिंब रामबाण उपाय आहे.
८. कडुलिंब पोटा संबंधित समस्याचे निवारण करतो.
९. कडुलिंब दात , हिरड्यांच्या समस्यांना दूर ठेवते.
१०. अनेक इन्फेकशन पासून बचाव होण्यासाठी कडुलिंब मदत करते.
११. साप चावल्यास प्रथमोपचार म्हणून कडुलिंबाचा वापर केला जातो.
१२. वजन कमी करण्यास कडुलिंब साहाय्य करते.
१३. कडुलिंबाच्या तेलाचा उपयोग केस वाढण्यासाठी व चमकदार होण्यासाठी तसेच सूज आल्यास केला जातो.
कडुलिंब हे वृक्ष सहज उपलब्ध होत असले तरी अनेक शेतकरी त्याची लागवड शेतजमिनीच्या चारही बाजूने करतात.
कडुलिंबाचे वृक्ष सावली देण्याचे काम देखील करते.
अशाप्रकारे कडूनिंब हे वृक्ष मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत बहुपयोगी आहे. त्याचप्रमाणे कडूलिंबा मध्ये कीटकांसाठी हानिकारक घटक आहेत त्यामुळे कडूनिंब हे शेतकऱ्यांच्या अत्यंत जवळचा मित्र मानला जातो. जसे की नीम पेंड नीम ओईल निंबोळी अर्क अशा प्रकारचे अनेक निविष्ठा या कडुनिंबापासून बनवून शेतीसाठी उपयोगात आपण आणू शकतो त्यामुळे सर्वांसाठी कडुनिंब हे रुक्ष अत्यंत महत्त्वाचे आहे प्रत्येकाने त्याची लागवड करून जोपासना केली पाहिजे.
Share your comments