पुष्कळ लोकांचा असा गैरसमज आहे की निसर्गउपचार आणि निसर्गोपासना एकाच आहे, म्हणून दोन्ही मधील फरक समजत नाही. दोन्ही मध्ये साम्य आहे परंतु दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
निसर्गोपचार तज्ञ निसर्गाचे महत्त्व मानतात. पण त्याबरोबरच नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीला मदतरूप होण्यासाठी अथवा रोग्याचे आरोग्य लवकर सुधारावे यासाठी जलोपचार, उपवास, मातीचे प्रयोग, योग्य खाणेपिणे, लोह चुंबकचिकित्सा, अॅक्युप्रेशर वगैरे बाह्यपचार करण्यास निसर्गोपचाराचे चिकित्सक तयार असतात.
निसर्गोपचार चिकित्सेत निष्णात असलेले लोक रोगनिदान करणे ही गोष्ट अनावश्यक समजत नाहीत. उपचार सुरू करण्यापूर्वी रोगाचा प्रकार, त्याची कारणे व इतर माहिती मिळवण्यासाठी आवश्यक अशी तपासणी व परीक्षण ते करतात.
हे ही वाचा - चांगल्या पचनशक्ती साठी काय खावे
अशा प्रकारे केलेले उपचार तर्कसुसंगत असतात. उपचार चालू असतानाही ते थोड्या थोड्या दिवसांनी सुधारणा व प्रगतीचा आढावा घेतात . निसर्गोपचाराने सर्वसाधारण, सामान्य रोगांवर औषधोपचार करणे सोपे असते पण रोग जेव्हा मूळ धरलेला व गुंतागुंतीचा असतो
त्यावेळी उपचारातही विविध प्रकारांचा उपयोग करावा लागतो. एखादया रोग्याच्या बाबतीत नैसर्गिक उपचारांचा उपयोग होत नाही असे वाटल्यास इतर चिकित्सेकडे रोग्यांनी वळावे असेही तेच सुचवतात.
निसर्गोपचारच का ?
सर्वप्रथम आपण विचार करूया इतर उपचार पद्धतींचा:- बहुसंख्य चिकित्सापद्धतीत रोगप्रतिबंधक व निवारण म्हणून औषधांचाच विचार करतात. श्रद्धावान औषधभक्त दृढपणे मानतात की औषधांचा शरीरावर परिणाम होतो. पण हा समज मुळातच चुकीचा आहे. शरीर औषधांवर परिणाम करते,
औषधे शरीरावर परिणाम करीत नाहीत ! जरा विचित्र वाटले तरी हे विधान संपूर्णपणे सत्य आहे. आपल्या शरीरात स्वास्थ्य टिकवणारी एक शक्ती आहे. तिला रोगनिवारण शक्ती अथवा जीवनशक्ती म्हणतात. शरीर निरोगी रहावे म्हणून ही शक्ती चोवीस तास कार्यरत असते. शरीराचे नुकसान करणारा अथवा आरोग्याचा हास करणारा कोणताही पदार्थ अति झाल्यास त्याला शरीराबाहेर फेकून देण्यास ती तत्पर असते. म्हणून निसर्गउपचार घेत असताना अन्य फायदेच होतात न की साईड इफेक्ट.
Share your comments