1. आरोग्य सल्ला

यकृताची (लिव्हरची) कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी नैसर्गिक उपाय

यकृत म्हणजेच लिव्हर हा शरीरातील सर्वात व्यस्त अवयव आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
यकृताची (लिव्हरची) कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी नैसर्गिक उपाय

यकृताची (लिव्हरची) कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी नैसर्गिक उपाय

हा स्वतःला दुरुस्त करण्याची प्रचंड शक्ती असलेला एकमात्र अवयव आहे. ऐवढेच नव्हे तर त्याच्यात इतर गोष्टी दुरुस्त करण्याची सुद्धा क्षमता आहे. बऱ्याच आजारांमुळे अल्कोहोल, फॅट, विषाणू, औषधांमुळे यकृताला इजा होते. त्याच्यावर इलाज नाही केले तरी यकृत स्वतःला दुरुस्त करू शकतो. दुसरा उपाय म्हणजे एखाद्या व्यक्तीचं ६० टक्के यकृत काढून टाकलं, तरी ते पुन्हा येऊ शकतं. म्हणूनच ज्या कारणामुळे यकृताचा आजार झाला आहे, त्यावर कारणांचा इलाज करणं हा तिसरा उपाय.यकृत बरं करण्यासाठी मानवाला १८०० कॅलरीजचा आहार घेण्याची गरज असते. त्यातल्या त्यात दिवसभरातून शरीराच्या प्रतिकिलो १.२ ग्रॅम प्रोटिन घेणं आवश्यक असते.एवढं खाल्लं नाही, तर यकृताची सुधारणा होण्याची प्रक्रिया खुंटते. यकृताला योग्य ती ऊर्जा मिळाली नाही, तर ते बरं होण्यास ते खूप वेळ घेते.

शरीरात पित्त निर्माण करण्यापासून ते टाकाऊ व विषारी घटक बाहेर टाकण्यापर्यंतची कित्येक कामे यकृतच करत असते. मात्र आजकालच्या बदलत्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे यकृताचे विकार जडण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.गतिमान जीवनशैलीसोबत जुळवून घेताना खाली काही नैसर्गिक उपाय दिले आहे ते केल्यास यकृताचे विकार कमी होण्यास निश्चितच मदत होईल :हळद : स्मोकिंग, अल्कोहोल, तणाव व जंकफूड या गोष्टीमुळे लिव्हरवर ताण पडतो. यामुळे अनेकांना लिव्हरच्या संदर्भातील आजार उद्भवतात. त्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर जेवणात नियमित हळदीचा वापर करावा. रात्रीच्या वेळी झोपताना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दूध प्यावे.टीप :हळदीचा नियमित जेवणात वापर केल्याने अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते. मात्र त्याचबरोबर रात्री हळदीचे दुध घेणेदेखील फार फायदेशीर आहे.

आवळा : आपल्या आहारात आवळ्याला समाविष्ट करावे.आवळ्यात व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात आढळते.त्यामुळे यकृताचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.आवळ्याचा अर्क यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करतो हे काही संशोधनांतूनही सामोरे आले आहे. मात्र च्यवनप्राशात प्रामुख्याने आढळणारा आवळा शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, पचनसंस्थेचे कार्य सुधारते.टीप :कच्चा आवळा लहान तुकडे करुन खाणे हे हितकारी आहे. पण तुम्ही खिसलेल्या आवळ्यात दही घालून रायता बनवूनही खाऊ शकता.ज्येष्ठमध : जे लोक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या लिव्हरमध्ये ट्रान्सएमानेज एन्झाइम्सचे प्रमाण वाढते. ज्येष्ठमधातील तत्त्व या एन्झाइमचे प्रमाण लिव्हरमधून कमी करण्यात सक्षम आहेत. त्यामुळे ज्येष्ठमध लिव्हरसाठी लाभकारी ठरते.टीप : उकळत्या पाण्यामध्ये जेष्ठमधाची पावडर टाका. थोड्यावेळाने पाणी गाळून त्याचे नियमित सेवन करणे आरोग्यास हितकारी आहे.ग़ूळवेल :जुने लोक आपल्या तुळशीच्या रोपांसोबत गुळवेलीचेही रोप लावत, कारण गुळवेल ही

तुळशीप्रमाणे आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. म्हणून जुने लोक गुळवेलीची ४-५ पाने दररोज चावून चावून खात.यकृताच्या विकारांवर प्रभावशाली औषधं म्हणजे गुळवेल !.गुळवेल शरीरातील विषारी घटक दूर करते, तसेच यकृताचे कार्य सुधारण्यास मदत करते. गुळवेलीचा अधिक काळ वापर केला तरीही त्याचा शरीरावर अपायकारक परिणाम होत नाही.अ‍ळशी : अळशीचा आहारात वापर केल्याने यकृतावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होते. तसेच अळशीमधील काही घटक हार्मोन्सचे संतुलन व कार्य सुरळीत राखते.टीप : निरोगी यकृतासाठी अळशीचे काही दाणे किंवा पूड सलाड, टोस्टवर टाकून खावे.भाज्या : काही भाज्या निरोगी यकृतासाठी आवश्यक एन्झाइम्स ग्रहण करण्यास मदत करतात. बीट, कोबी, ब्रोकोली, कांदा, लसूण अशा भाज्या आहारात ठेवा. ब्रोकोली, कांदा, लसूण यांमध्ये सल्फर अधिक प्रमाणात असल्याने यकृताकडून होणारे डीटॉक्सीफिकेशन (नैसर्गिकरित्या शरीर स्वच्छ करण्याची प्रक्रिया) सुधारते.

English Summary: Natural remedies to restore liver function Published on: 26 May 2022, 08:47 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters