आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आणखी ही गुलामी सोडली नाही, हेच आपलं दुर्भाग्य, शेवग्याचा वेगवेगळ्या पद्धतीने आपण पूर्वी पासून आहारात उपयोग करत आलो आहोत आणि हो शेवग्याच्या पानांची पावडर ही आपले आज्जी-आजोबा वापरायचे परंतु ते विसरून शेकडो रुपये खर्च करून मोरिंगा पावडर घरी आणून खाताना व्हिटॅमिन मिनरल्स चा विचार आपण हल्ली करत आहोत, परंतू आपण घरी देखील अशी पावडर बनवून आहारात वापरू शकतो, ते ही अगदी केमिकल फ्री.शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले, खाण्यासाठी वापरतात.
शेवग्याच्या झाडाच्या ताज्या हिरव्यागार पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, ॲंन्टिऑक्सिडंट आणि अमिनो ॲसिड असतात. पाने वाळवून पावडर करून ठेवणे व आहारात वापरणे अधिक सोईचे आहे. वाळलेल्या पानांची पावडर वर्षभर टिकते. झाडांची ताजी हिरवीगार पाने तोडून स्वच्छ धुवावीत आणि सावलीमध्ये वाळवावीत. उन्हात वाळवताना त्याला संरक्षित पद्धतीमध्ये शक्यतो सोलार ड्रायरचा वापर करून वाळवावे म्हणजे त्यावर कचरा, धूळ, किडे अथवा इतर घाण बसणार नाही आणि स्वच्छ वाळलेली पाने मिळतील. तसेच वेळही वाचेल. वाळलेली पाने मिक्सरमधून बारीक करून चाळून घ्यावीत. ही पावडर भाजी, वरण, भाकरी, पराठे अथवा सुपमधून वापरता येईल.
पानाचे आरोग्यादायी फायदे लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे रक्तक्षय कमी होण्यास मदत होते.हाडांना मजबुती येते. मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर. शरीरातील दाह कमी होतो.झिंकचे प्रमाण असल्यामुळे केस गळती थांबून केसांच्या वढीस मदत होते.जीवनसत्त्व 'अ', 'क' आणि 'इ' चे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्वचा निरोगी राहाते, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. कोलेस्ट्रोल कमी करून रक्त गोठण्यापासून वाचवते. जीवनसत्त्व अ डोळ्यांना निरोगी ठेवते.रक्तदाब नियंत्रित राहतो, यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.
व मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी शेवगा पावडर उपयुक्त आहे. अँटिऑक्सिडेंटस भरपूर असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कॅन्सरच्या वाढीसदेखील अटकाव करते. पाल्यातील चोथ्याचे प्रमाण बद्धकोष्टता कमी करते. शेवग्याचा पाला अँटिवायरल, अँटिबॅक्टेरीएल, अँटिफंगल आहे.या औषधी गुणधर्मामुळे शरीरातील जंतू संसर्ग नष्ट होऊन शरीर शुद्धीकरण होते. तसेच जखम भरून येण्यासदेखील मदत होते.मधुमेहात देखील फायदेशीर आहे. लहान मुलांमधील कुपोषण टाळण्यास किंवा कमी करण्यास उपयोगी.
Share your comments