1. आरोग्य

कोणते दूध आहे आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर गाईचे की म्हशीचे, जाणून घ्या

KJ Maharashtra
KJ Maharashtra
milk benifit health

milk benifit health

 आपल्याला दुधाच्या पोषक तत्त्वं बद्दल माहितीच आहे. आपल्या आहारात दुधाचा वापर केला तर शरीराला मिळणारे बरेचशे पोषक तत्व दुधातून उपलब्ध होतात. दुधात असलेली प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे प्रत्येकजण दूध पिण्यावर भर देत असतो. प्रामुख्याने आपण गाय किंवा म्हशीचे दूध पिण्यासाठी वापरतो. परंतु गाय किंवा म्हशीचे दूध पैकी कोणते दूध शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसते. या लेखात आपण त्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

 जर गाईच्या दुधाचा विचार केला तर हे म्हशीच्या दुधाच्या तुलनेत पचनास हलके आणि कमी चरबीयुक्त आहे. त्यामुळे लहान मुलांना गाईचे दूध पिण्यास दिले जाते. त्या तुलनेने म्हशीच्या दुधाचा विचार केला तर हे जास्त जाड आणि मलई युक्त असते. म्हणून म्हशीच्या दुधाचा उपयोग हा कुल्फी, तूप दही, खीर  इत्यादी जड वस्तू बनवण्यासाठी वापर केला जातो. त्यातुलनेत गाईच्या दुधापासून रसगुल्ला, रसमलाई इत्यादी बनवले जाते. गाईच्या दुधाच्या तुलनेत म्हशीचे दूध हे बरेच दिवस साठवून ठेवता येते परंतु गाईचे दूध हे एक ते दोन दिवसात सेवन करावे लागते.

म्हशीच्या दुधात प्रथिने जास्त असतात तसेच चरबी जास्त असते. त्यामुळे सहाजिकच म्हशीच्या दुधात कॅलरीज जास्त असतात. गाईच्या दुधात पाण्याचे प्रमाण अधिक असून घनतेचे प्रमाण कमी आणि 90 टक्के दूध पाण्यापासून बनलेले असते. गाय आणि म्हशीच्या दुधाचे तुलना आपण घटकांद्वारे समजून घेऊ.

  • चरबी:

म्हशीच्या दुधापेक्षा गाईच्या दुधात चरबीचे प्रमाण कमी असते. गाईच्या दुधात तीन ते चार टक्के चरबी असते तर म्हशीच्या दुधात सात ते आठ टक्के चरबी असते.

  • प्रथिने:

गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात दहा ते अकरा टक्के प्रथिने असतात. प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.

 

  • कॅलरी:

म्हशीच्या दुधात कॅलरी जास्त असतात. कारण त्यात प्रथिने आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. एक कप म्हशीच्या दुधात 237 कॅलरी असतात. तर एक कप गाईच्या दुधात 148 कॅलरीज असतात.

  • कोलेस्टेरॉल:

म्हशीच्या दुधात कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. म्हणूनच म्हशीचे दूध है उच्चरक्तदाब, मूत्रपिंडाच्या समस्या आणि लठ्ठपणामुळे पीडित लोकांसाठी चांगले असल्याचे सिद्ध होते.

 

 तसे पाहायला गेले तर दोघंही दूध आपल्यासाठी फायदेशीर आहेत आपल्या शरीरासाठी जे योग्य वाटेल ते गरजेनुसार दूध प्यावे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters