स्टीव्हियाचे औषधी गुणधर्म

11 April 2019 04:49 PM


मधुपर्णी (स्टीव्हिया) हि एक विलक्षण औषधी वनस्पती असून सध्याच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात वैद्यकीयदृष्ट्या खूपच महत्वपूर्ण ठरत आहे. भविष्याच्या काळात मधुपर्णी पासुन निर्माण केलली साखर हि व्यासायिकदृष्ट्या अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये वरदान ठरणार आहे. मधुपर्णीची ओळख आणि या वनस्पतीची मागणी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे याची  मानवी शरीरामध्ये कमी कर्बोदके राखण्याचे प्रमाण या वैशिष्ट्यामुळे दिवसेंदिवस याची मागणी वाढतच आहे, कारण अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये वाढत चालेली कृत्रिम गोडवा निर्माण करणाऱ्या साखरेच्या अतेरेकी वापरामुळे वाढत चालेल्या आरोग्य विषयक समस्यांमुळे मधुपर्णीच्या पानांपासुन निर्माण केलेली साखर वरदान ठरत आहे.

विविध प्रकारच्या शोध अभ्यासांमध्ये असे प्रमाणित करण्यात आले आहे, कि भविष्याच्या काळामध्ये मधुपर्णी (स्टीव्हिया) या वनस्पतीच्या पानांपासुन निर्माण केलेली साखर हि आरोग्याच्या दृष्टीकोनातून वरदान ठरणार आहे, कारण मधुपर्णी (स्टीव्हिया) या वनस्पतीच्या पानांन मध्ये असलेले स्टीविओसाईडचे प्रमाण.

मधुपर्णी (स्टीव्हिया) हि एक बारमाही हंगामातील उगवणारी वनस्पती असून याची मुळ उत्पत्ती साऊथ अमेरिकेतील असून, सध्या मात्र भारताच्या अनेक राज्यांमध्ये जसे कि, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ आणि ओरिसा यांमध्ये उत्पादन केले जात आहे. मधुपर्णी (स्टीव्हिया) या वनस्पतीच्या वाढीसाठी लाल-काळी माती लागते जिचा सामू 6.5 ते 7.5 या दरम्यानमध्ये आहे, तसेच मधुपर्णीच्या योग्य वाढीसाठी हवामान अर्ध दमट आणि उष्णकटीबंधीय प्रकारचे हवामान आवश्यक आहे.

गुणधर्म:

  • मधुपर्णी (स्टीव्हिया) हि एक विलक्षण औषधी वनस्पती मधुपर्णी च्या पानांन पासुन निर्माण केलेली साखर हि मानवी शरीरा मध्ये कमी कर्बोदके निर्माण करून कॅलरीजचे योग्य प्रमाण राखण्यात महत्वपूर्ण जबाबदारी बजावते यामुळे मधुमेहींच्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
  • मधुपर्णी (स्टीव्हिया) च्या साखरेचा गोडवा हा साधारण साखरेच्या 200-300 पट जास्त असल्यामुळे तिचा कमी प्रमाणात केलेला वापर हा अधिक गोडवा निर्माण करतो त्यामुळे कोलेस्टेरोल वाढीवर निर्बंध लागतात, या मुळे हि औषधी वनस्पती ह्रदयरोगीं साठी  वरदान ठरत आहे.
  • काही शास्त्रज्ञानीं वैद्यानिक दृष्ट्या अभ्यास केला असता त्यांना असे आढळून आले कि, मधुपर्णीच्या वनस्पतीच्या पानांन मध्ये असलेले स्टीविओसाईडचे आणि रिबोडायोसाईड या विशिष्ट घटकांमुळे स्वादुपिंडाच्या कॅन्सर ची भीती 23% घटते, तसेच रक्तप्रवाह आणि रक्ताचा दाब सुरळीत राखण्यात या घटकांचा वैशिष्ट्यपुर्ण फायदा होतो.
  • मधुपर्णी याऔषधी वनस्पती मध्ये असलेल्या खनिजांच्या मुबलक प्रमाणामुळे हाडांच्या समस्यांमध्ये जसे कि, हाडांची ठीसुळता या प्रकारच्या आजारांमध्ये हि वनस्पती गुणकारी ठरते.
  • मधुपर्णी याऔषधी वनस्पतीच्या वापरामुळे शरीरातील कॅलरीजचे योग्य प्रमाण राखण्यात मदत होते यामुळे लठ्ठपणा आणी लठ्ठपणामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मधुपर्णीच्या पानांपासुन निर्माण केलेल्या साखरेचा आणी अन्नपदार्थांचा वापर हा अत्यंत गुणकारी ठरतो. 

मधुपर्णीच्या साखरेचा वापर:

  • मधुपर्णीची शास्त्रीय पद्धतीने बनवेलेली साखर सध्या सहजरीत्या बाजारामध्ये उपलब्ध आहे, या साखरेचा दैनंदिन वापरात समावेश करू शकतो जसे कि, चहा, कॉफी आणी इतर गोड अन्न पदार्थ.
  • सध्या बाजारांमध्ये मधुपर्णी पासुन बनवेलेली चोकॉलेट, फळांची शरबत सहजरीत्या उपलब्ध आहेत.
  • साधारण साखरेप्रमाणे मधुपर्णी पासुन निर्माण केलेली साखर हि पारंपारिक भारतीय व्यंजनांमध्ये वापर करू शकता येतो फक्त तिचा योग्य प्रमाणात वापर व्हायला हवा कारण मधुपर्णी पासुन निर्माण केलेली साखर 200-300 पट साधारण साखरेपेक्षा गोड आहे.
  • विविध प्रकारच्या बेकरी उत्पादनांमध्ये जसे कि, बिस्किटस, केक आणी कुकीज यांमध्ये मधुपर्णी पासुन निर्माण केलेल्या साखरेचा वापर केला जाऊ शकतो.

श्री. नरेंद्र मा. देशमुख व प्रा. डॉ. ए. आर. सावते
(अन्न व अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, व. ना. म. कृ. वि, परभणी)
9096050575 
                       

Stevia स्टीव्हिया मधुपर्णी मधुमेह sugar Diabetes स्टीविओसाईड Stevioside
English Summary: Medicinal Properties of Stevia

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.