कर्करोग हा त्यातीलच एक आजार. तंबाखू हा आरोग्यास हानिकारक आहे, त्याचे व्यसन सोडा हा संदेश देणारा आजचा विशेष दिन म्हणजे 'वर्ल्ड नो टोबॅको डे'! तुम्ही सुद्धा हि माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहचवून समाजात जनजागृती करा आणि आपल्या ओळखीच्या लोकांना, मित्रमंडळींना ज्यांना तंबाखूचे व्यसन आहे त्यांना हे व्यसन सोडण्यास भाग पाडा.डॉक्टरांच्या मते तंबाखूच्या धुरा मध्ये ७००० केमिकल्स असतात ज्यापैकी ५० केमिकल्समुळे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही कोणा धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर हे केमिकल्स तुमच्या शरीरातही प्रवेश करतात आणि जास्त वेळ राहतात.
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की एखादा व्यक्ती फुफ्फुसाच्या कर्करोगाने मेला पण त्याने कधीच व्यसन केलं नव्हतं.तर मंडळी त्याचा जीव याच पद्धतीने गेलेला असतो. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांपासून दूरच राहावे.आता तुम्ही म्हणाल की यापासून मी कसा वाचू किंवा स्वत:चा कसा बचाव करू? तर मंडळी जर तुम्ही शहरात राहत असाल तर अशा धुम्रपानापासून तुम्ही जास्त काळ स्वत:चा बचाव करू शकत नाही. कारण शहरात ठिकठिकाणी सिगारेट ओढत लोक फिरत असतात. यावर उपाय एकच तो म्हणजे जनजागृती होणे आणि लोकांनी स्वत:हून धुम्रपानाचे व्यसन सोडणे.
पण फक्त याच दिवशी जनजागृती करावी असं नाही. हि जनजागृती वर्षाचे ३६५ दिवस झाली तरच फरक पडेल. ३१ मे हा दिवस फक्त लोकांना आठवण करून देण्यासाठी आहे की आपण अजूनही तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त झालेलो नाही. आपली लढाई अजून बाकी आहे. मंडळी तुम्ही सुद्धा एक सुजाण नागरिक म्हणून या लढाईत सहभाग दर्शवला पाहिजे. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर हे व्यसन सोडायचा प्रण घ्या. जर तुम्ही निर्व्यसनी असाल तर इतरांना हे व्यसन सोडायला प्रवृत्त करा, अनोळखी माणसांना तुम्ही समजावू शकत नसलात तरी ओळखीच्या माणसांना तुम्ही नक्कीच समजावू शकता. चला तर आजपासून आपण सर्वांनी मिळून पुढाकार घेऊया आणि तंबाखूला कायमचं हद्दपार करुया.
तंबाखूमुळे शरीरास किती अपाय होतात आणि किती जीवघेणे आजार आपल्याला विळखा घालतात हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. कर्करोग हा त्यातीलच एक आजार. तंबाखू हा आरोग्यास हानिकारक आहे, त्याचे व्यसन सोडा हा संदेश देणारा आजचा विशेष दिन म्हणजे 'वर्ल्ड नो टोबॅको डे'! तुम्ही सुद्धा हि माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहचवून समाजात जनजागृती करा आणि आपल्या ओळखीच्या लोकांना, मित्रमंडळींना ज्यांना तंबाखूचे व्यसन आहे त्यांना हे व्यसन सोडण्यास भाग पाडा.
Share your comments