धकाधकीचे आयुष्य आणि बदलती जीवनशैली यामुळे मधुमेहाचा आजार आजकाल खूप वेगाने पसरत आहे. या आजारामुळे बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: भारतात, सर्वात जास्त मधुमेह रुग्ण आहेत. या आजारामुळे आतापर्यंत कितीतरी लोकांचे प्राण गमावले आहेत. तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखरेची पातळी वाढण्यामुळे आणि स्वादुपिंडा पासून इंसुलिन संप्रेरक तयार न झाल्यामुळे मधुमेह हा आजार होतो.
या आजाराला नियंत्रित करण्यासाठी सर्वात मोठे काम म्हणजे रक्तातील साखर नियंत्रित करणे. आपण देखील मधुमेहाचे रुग्ण असल्यास आणि आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करू इच्छित असल्यास, काही घरगुती उपचार आहेत, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित होऊ शकते.
बर्याच संशोधनात असे समोर आले आहे की, आंब्याच्या पानांचे सेवन केल्यास तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित होऊ शकते.
आंब्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. आंब्याच्या अनेक प्रकारांत ‘लंगडा आंबा’ सर्वात उत्तम मानला जातो. आरोग्याच्या बाबतीत तो खूप फायदेशीर ठरतो. मधुमेह रूग्णांना गोड पदार्थ खाण्याची परवानगी नाही. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आंब्याचे सेवन केले पाहिजे.
हे ही वाचा- कोकम सरबताचे करा सेवा म्हणजे होतील फायदे आणि जाणून घ्या रेसिपी
तथापि, मधुमेहाच्या रुग्णांसाठी आंब्याची पाने संजीवनी औषधी वनस्पती समतुल्य मानली जातात. त्याच्या वापराने ताबडतोब रक्तातील साखर नियंत्रण केली जाते. त्यात फायबर, व्हिटामिन सी आणि पॅक्टिन असते, जे मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे.
एका संशोधनात आंब्याच्या पानांवर विस्तृत अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, मधुमेहाच्या रुग्णांसाठी आंब्याची पाने संजीवनी औषधी वनस्पती प्रमाणेच आहेत. याचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणातच राहते तर, कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते.
हे संशोधन उंदरांवर केले गेले. यामध्ये उंदरांच्या अन्नात आंब्याच्या पानांच्या भुकटीचे मिश्रण घालून देण्यात आले. या संशोधनाच्या परिणामी असे आढळले की, आंब्याची पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात सक्षम आहेत.
कसा कराल वापर ?
मधुमेह रूग्ण रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आंब्याच्या पानांचे दोन प्रकारे सेवन करू शकतात. यासाठी आंब्याची पाने पाण्यात उकळा. यानंतर पाणी थंड झाल्यावर, ते पाणी प्या. त्याच वेळी, ती उकडलेली पाने फेकून द्या. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी आंब्याच्या पानांचे पाणी प्यायल्याने जास्त फायदा होतो.
याशिवाय आंब्याची पाने सुकवून, त्याची पावडर तयार करुन दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात मिसळून प्या. मधुमेह रूग्णांना या दोन्ही पद्धतींच्या वापरामुळे बराचसा फायदा मिळतो.
(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
Share your comments